Assembly Election 2024: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना टीव्हीवर जाहिरात द्यावी लागणार; आयोगाने सांगितला कठोर नियम

Election commission press conference: मुख्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्या तरी लवकरच आचारसंहिता लागेल, असं दिसून येतंय. पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आम्ही ११ राजकीय पक्षांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत.
Assembly Election 2024: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना टीव्हीवर जाहिरात द्यावी लागणार; आयोगाने सांगितला कठोर नियम
Updated on

Rajiv Kumar: केंद्रीय निवडणूक विभागाने शनिवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबद्दल सविस्तर माहिती दिली. २६ नोव्हेंबरला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका जाहीर होतील, असं त्यांनी सांगितलं.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्या तरी लवकरच आचारसंहिता लागेल, असं दिसून येतंय. पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आम्ही ११ राजकीय पक्षांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत.

राज्यात निवडणूक जाहीर करताना दिवाळसणाचा विचार करावा, सुट्ट्यांचा अंदाज घ्यावा अशा सूचना राजकीय पक्षांनी केल्या. याशिवाय निवडणुकीतला पैशांचा वापर थांबवावा, अधिकाऱ्यांच्या निःपक्ष बदल्या व्हाव्यात, फेक न्यूजवर आळा घालावा, याही मागण्या राजकीय पक्षांनी आयोगाकडे केल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

Assembly Election 2024: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना टीव्हीवर जाहिरात द्यावी लागणार; आयोगाने सांगितला कठोर नियम
Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी? तुफान पाऊस, सणासुदीचे दिवस, आयोगाचे आस्ते कदम...

राज्यामध्ये २८८ विधानसभा मतदारसंघ असून १ लाख १८६ पोलिंग बूथ आहेत. तसेच ९.५३ कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ४.९३ कोटी तर स्त्री मतदार ४.६० कोटी आहेत. १८.६७ लाख प्रथम मतदार आहेत.

राज्यात खुल्या प्रवर्गासाठी २३४ मतदारसंघ आहेत. तर २५ मतदारसंघ एसटी आणि २९ मतदारसंघ एससीसाठी राखीव आहेत. निवडणुका शांततेत आणि सुविधेसह पार पडाव्यात यासाठी केलेल्या उपाययोजनांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांसाठी नियम

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत बोलताना राजीव कुमार म्हणाले की, ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन त्याबाबत डिक्लरेशन द्यावं लागेल. याशिवाय त्या पक्षांनाही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का तिकीट दिलं, याची अशीच जाहिरात द्यावी लागेल.

तब्बल तीन दिवस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशी जाहिरात पक्ष आणि उमेदवाराला प्रसिद्ध करावी लागले. नसता त्या उमेदवारावर कारवाई करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.