Maharashtra Assembly Elections: मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 96,96,96... मुख्यमंत्री कुणाचा होणार?

Maharashtra Assembly Elections: काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या, आघाडीच्या नेत्यांनी हे फेटाळत एकत्र निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Elections
Maharashtra Assembly Electionsesakal
Updated on

लोकसभा निवडणुकांनतर आता विधानसभा निवडणुकांचे तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व राजयकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरवात केली असून जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतील मात देण्याऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणूक २०२४ साठी फॉर्म्युला ठरला आहे.

समसमान जागा घेण्याबाबत मविआत विचार सुरु असल्याची माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. तसेच अधिक आमदरा असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे. मविआत प्रत्येक पक्षाला विधानसभेसाठी ९६ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीने यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस एकदिलाने लढतील. काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या, आघाडीच्या नेत्यांनी हे फेटाळत एकत्र निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील जनतेने भाजपला उत्तर दिले आहे. हा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी होता. हा विजय आमचा शेवटचा नाही, तर लढाई नुकतीच सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 

Maharashtra Assembly Elections
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर; थेट मुख्यमंत्र्यांना फोन

विधानसभा निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काय केले ते सर्वांसमोर आहे. याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असे देखील ठाकरे म्हणाले. 

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात आमची पहिली बैठक झाली. या बैठकीत आम्ही सर्वजण मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले. लोकशाही वाचवण्यात राज्यातील जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांनीही सरकारला संदेश दिला आहे. महायुतीचे धार्मिक ध्रुवीकरणही कामी आले नाही. येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. जनतेने जाणीवपूर्वक मतदान केले. आमच्यात कोणी लहान किंवा मोठा भाऊ नाही. आपण सर्वजण भेटून चर्चा करणार असल्याचे  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान म्हणाले. 

Maharashtra Assembly Elections
Pankaja Munde: पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करुन भाजपला कसा फायदा होणार? फडणवीसांची विधानसभेसाठी चाणक्यनीती काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.