Assembly Elections: विधानसभा निवडणुकांसाठी पहिला उमेदवार ठरला! महायुतीतूनच फडणवीसांच्या मर्जीतल्या आमदाराला आव्हान

Maharashtra Assembly Elections : महायुती सरकारमध्ये असतानाही भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहे.
Maharashtra Assembly Elections
Maharashtra Assembly Electionsesakal
Updated on

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात रंगणार आहे. मात्र, महायुतीत असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांनी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करत, महायुतीतूनच फडणवीसांच्या मर्जीतल्या आमदाराला आव्हान दिले आहे. तसेच, दिव्यांग लाभाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे.

अरविंद पिसे यांना माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. अरविंद पिसे यांची माण खटाव विधानसभेसाठी उमेदवारीची घोषणा केलेली आहे. या तालुक्यात त्यांचे काम चांगले आहे आणि पाणी प्रश्नाबाबत त्यांचा अभ्यासही उत्तम आहे, असे कडू म्हणाले.

महायुती सरकारमध्ये आव्हान-

महायुती सरकारमध्ये असतानाही भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीचले आमदाराविरोधात मैदानात उतरवण्याचे धाडस आमदार बच्चू कडू यांनी दाखवले आहे. सातारा जिल्ह्यातील माण खटावमध्ये सध्या भाजपचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत.

Maharashtra Assembly Elections
Worli Hit-and-Run Case : पोलिसांचं नेमकं काय सुरूए? मिहीर शहाला काळ्या काचांच्या खासगी गाडीतून नेलं कोर्टात

दिव्यांग लाभाचा गैरवापर: पूजा खेडकर प्रकरण

बच्चू कडू यांनी दिव्यांग लाभाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पूजा खेडकर ही दिव्यांग नसताना तिने याचा लाभ घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावर कडू यांनी एक समिती गठीत करण्याची घोषणा केली असून, फसवणूक करून दाखले घेतलेल्यांवर सुधारित नवीन कलमानुसार गुन्हे दाखल होतील.

Maharashtra Assembly Elections
Aarakshan Bachav Janyatra: वंचित काढणार 'आरक्षण बचाव जनयात्रा'; प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.