Maharashtra Session: दिवसभरात आधिवेशनात काय घडले जाणून घ्या

Vidhan Bhavan
Vidhan BhavanSakal
Updated on

विचारांची लढाई विचाराने लढावी- एकनाथ खडसे

एकनाथ खडसे म्हणाले विचारांची लढाई विचाराने लढावी, एकमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उचलले हे काय योग्य नाही. अधिवेशन काळात विधानसभेच्या सर्व नियमांचे पालन करून आंदोलने करावी. निषेध किंवा आंदोलने शांततेचा मार्गाने करावीत.

शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

ते म्हणाले गेल्या 6 दिवसांपासून विरोधी पक्षाचे आमदार आंदोलन करताना आमच्यावर रोज वेगवेगळे आरोप करत आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी आमचे प्रतोद भरत गोगावले यांच्या नेतृत्वात आमदारांची बैठक झाली या बैठकीत विरोधकांच्या घोषणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करायचं असं त्यांनी सांगितलं होते.त्यामुळे आम्ही आंदोलन केलं होत.

मुख्यमंत्री शिंदेंनी गायली पुन्हा कविता

दुरूस्त करु द्या चुका काही

अचुकतेचा हात धरु द्या

खुप केले तुमच्यासाठी

आता जनतेसाठी करु द्या

आम्ही घटनाबाह्य कृती केलेली नाही- एकनाथ शिंदे

आम्ही बेकायदेशीर कोणतही काम करणार नाही. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. बहुमताच्या नियमानुसार आम्ही काम करतो. आमजे बहुमत वाढत चालल आहे. त्यामुळे आम्ही कशाला आणि कोणाला घाबरू असा सवाल एकनाथ शिंदेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच, सुप्रिम कोर्ट असेल, न्यायालय असेल, शेवटी घटनेच्या तरतुदीप्रमाणेच निर्णय घेतले जातात. आम्ही घटनाबाह्य कृती कोणतीही केलेली नाही. हीच तर अडचण झाली आहे.

विधानसभेत वॉर्डरचनेवरुन चर्चा

वॉर्ड रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवदेन दिले. वॉर्ड रचनेविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी आहेत. विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन जनगणनेनुसार वॉर्ड रचना चुकीची. असे मुख्यमंत्री म्हणाले.

अमोल मिटकरी राजकारणातील विचारांचा काळा डाग – महेश शिंदे

धक्काबुक्की प्रकरणानंतर आमदार महेश शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमोल मिटकरींवर जहरी टीका केली आहे. अमोल मिटकरी राजकारणातला डाग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक घोषणा देत आम्हाला चिथावत होते. आज आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेने आंदोलन करत होतो. त्यादरम्यान मागून काही सदस्य पुढं आले आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, धक्काबुक्की केली, गाजरं आणली. हे गैरवर्तन अशोभनीय आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. अडीच वर्षातल्या गैरकारभाराचा पर्दाफाश करत होतो. ते मागून आले. त्यांनी आमचं लोकशाहीने चाललेलं आंदोलन दाबण्याचा त्यांचा प्रयत्न केला

आमदारांना झालेल्या धक्काबुक्कीवरून अजित पवारांची शिंदे गटावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अजित पवार यांनी विधीमंडळात बोलताना शिंदे गटावर टीका केली. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, ‘चारोच्या मनात चांदणं’ असा हा प्रकार असल्याचे अजित पवार म्हणाले.

तसेच, अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असलतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याचे अजित पवारांनी म्हटले.

अन् विधानभवनात फडणवीसांच्या मदतीला अजित पवार आले धावून

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी होत म्हणाले, राज्याचे गृहमंत्री हे याअगोदर मुख्यमंत्री होते, त्यांनी वकीली केली आहे. पण ते आमदार म्हणतात, असंच उत्तर दिले पाहिजे, तसेच उत्तर दिले पाहिजे असा आगृह ते व्यक्त करु शकत नाहीत.

आमदार कांदे म्हणाले, अहो फडणवीस साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही इकडं आलोय…

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांना हा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. या भ्रष्टाचाराच्या बाबतीत सरकारने पुन्हा न्यायालयात अपील का केले नाही, असा त्यांचा प्रश्‍न होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही.

यानंतर त्यांनी थेट झाल्याने ‘अहो फडणवीस साहेब, असं काय करताय..? तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय...’, असे विधान केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापलं

अधिवेशनातच भर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापलं. प्रश्नोत्तरांची उत्तर योग्य पद्धतीने देण्याच्या सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले. उत्तर देताना हे खरे नाही अशी उत्तर देऊ नका. यापुढे असे उत्तर खपवून घेणार नाही. बऱ्याच प्रश्नांच्या लेखी उत्तरात हे खरे नाही असे उत्तर दिले जाते यावरून फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापले.

आम्हीच त्यांना धक्काबुक्की करणार; भरत गोगावलेंचा विरोधकांना इशारा

कोव्हिडच्या काळापासून त्यांचा इतिहास आम्ही बाहेर काढला. त्यांची वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही जसाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुले आमचा नाद करायचा नाही. त्यांनी आमचा चुकून पाय लागला तर त्यांना आम्ही नमस्कार करेन. पण त्यांचा पाय लागला तर आम्ही त्याला सोडत नाही अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गद्दार गद्दार म्हणून आरोप करत आहेत. जे आम्ही केलं ते आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की बॅनरबाजी करायचं. ते जेव्हा घोषणाबाजी करत होते. तेव्हा आम्ही आलो नाही. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही १७० लोको त्यांच्या आंदोलनाला आलो असतो तर तुम्हाला समजलं असत. आम्ही काय बोलत होतो तेव्हा त्यांनी यायला नको होतं. याच अर्थ त्यांना झोंबलं. मिरची जशी चावल्यानंतर झोंबते तशी त्यांना झोंबली. कारण त्यांचा आम्ही इतिहास बाहेर काढला.

आम्ही बोलताना त्यांनी येऊन पायऱ्यांवर गोंधळ घालायचा हा कुठला प्रकार आम्ही काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही जसात तसे उत्तर त्यांना आम्ही दिले आहे.

आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाली; धक्काबुक्कीनंतर मिटकरींचा दावा

सत्ताधारीही घोषणा देत होते. काल मविआच्या बैकीत शेतकऱ्यांच्या मुद्दे महत्त्वाचे - त्यामुळे ओला दुष्काळाची मागणी करण्यासाठी साडेदहा तिथे जमायचं ठरलं. सत्ताधारीही त्याआधीच तिथे पोचले. कोणी शिंदे नावाच्या आमदारांनी तिथे धक्काबुक्की केली, आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. आम्ही संस्कृती जपणारी माणसं, पवारांचे विचारांवर चालणारी, मी या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारणारच. ५० खोके एकदम ओक्के त्यांच्या जिव्हारी लागलं. शांततेत आंदोलन सुरू होतं. हे राज्याला अशोभनीय आहे. शिंदे नावाच्या आमदारांनी पत्रकारांनाही धक्काबुक्की केली - अजितदादांनी समजावून सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेलं. सुरुवात त्यांनीच केली, गैरवर्तन केलं.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला. आई-बहिणींनीवरुन शिवी दिली असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.

सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या- अजित पवार

महाराष्ट्रातील सर्व जनता पाहतिय की १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागल्या.

सत्ताधाऱ्यांच पायऱ्यांवर आंदोलन

नेहमी विरोधक पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करत असतात. मात्र, आज सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहे. कोव्हीड घोटाळ्याप्रकरणी भाजप आक्रमक झालेत. कोविडच्या भितीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले त्यांच्या घरोघरी अशा कविता स्वरुपात भरत गोगावलेच मातोश्री विरोधात घोषणाबाजी केली आहे.

तसेच, सचिन वाजेचे खोके मातोश्री ओके. अनिल देशमुखचे खोके सिल्व्हर ओक ओके अशी घोषणा देण्यात आली. शिवसेनेने कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

नितेश राणेंना फडणवीसांचे उत्तर

नितेश राणे यांनी मांडलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे. आपल्याकडे धर्मांतराबाबत कायदा आहे. जबरदस्तीने किंवा आमिष देऊन कोणीही कोणाचं धर्मांतरण करू शकत नाही, याबाबत कायद्यात तरतुदी आहेत. जर यात काही त्रुटी असतील तर यात सुधारणा करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“पीडिता ही अल्पवयीन असताना आरोपी इम्रान कुरेशी याने तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार होऊनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणीतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सानप यांचे आरोपीबरोबर काही संबंध आहेत का? याचीही तपासणी करण्यात येत आहे, जर असे काही संबंध निघालेत, तर सानप यांच्यावरही कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल”, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केलं जातं - नितेश राणे

हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.

विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची अजित पवारांनी घेतली भेट

मंगळवारी विधानभवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सुभाष देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यावर सध्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन देशमुख यांच्या तब्यतीची चौकशी केली

धर्म परिवर्तनाचा मुद्दा गाजणार

जबरदस्तीने होणाऱ्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा आज भाजपचे आमदार नितेश राणे लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात आज त्यांची तिसरी लक्षवेधी आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार यावर काय निर्णय घेते पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस होता गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरला आहे. चौथ्या दिवशी मुंबईतील खड्डे आणि ट्राफिकचा प्रश्न चांगलाच गाजला. गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यां विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. सध्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न देखील चांगलाच तापला आहे. या सर्व पार्श्वभूमीर आजचा पाचवा दिवस देखील वादळी ठरला आहे. तसेच, जबरदस्तीने होणाऱ्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा आज भाजपचे आमदार नितेश राणे लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडला आहे. विधानसभेच्या कामकाजात आज त्यांची तिसरी लक्षवेधी झाली.(Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Live)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.