मुंबई - विधानसभा निवडणुकीत अनेक नवख्या उमेदवारांनी दिग्गजांना घरी पाठवत इतिहास रचला आहे. कोणी आई-वडिलांच्या पराभवाचा, कोणी गद्दारीचा तर कोणी अपमानाचा वचपा काढला, असे ७० उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेच्या सभागृहात प्रवेश करत आहेत. यात प्रामुख्याने वरुण सरदेसाई, रोहित पाटील, संजना जाधव, श्रीजया चव्हाण, बाबासाहेब देशमुख, सुहास बाबर, महेश सावंत अशा सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश आहे.