विधिमंडळात आता जावई-सासऱ्याची जोडी
विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेले भाजपा नेते राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यावरुन विधानसभेत अनेक नेत्यांनी मिश्किल टिप्पणीही केली आहे.
सुधीर मुनगंटीवारांनी नार्वेकरांसाठी सादर केली कविता
सार्वभौम हे सभागृह असे पवित्र
आदर्शवत असे तुमचे चरित्र
न्यायव्यवस्था हे अध्यक्षपदाचे बलस्थान
तुम्ही राखाल या पदाचा बहुमान
या पदावर शोभुनी दिसतात नार्वेकर
रामशास्त्रींचा वसा जपतील नार्वेकर
तरुणाईने नेहमीच घडविला चमत्कार
तुम्ही सुद्धा रचाल नवा इतिहास
उत्कृष्ट होईल तुमची कारकीर्द
हीच आमची तुम्हाला आकाशभर शुभकामना
सभागृहात आज राष्ट्रवादी पक्षाकडून अनुपस्थित आमदार
नवाब मलिक
अनिल देशमुख
निलेश लंके
दिलीप मोहिते
दत्तात्रय भरणे
अण्णा बनसोडे
बबनदादा शिंदे
नरहरी झीरवळ (मतदान करू शकत नाही)
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. ठाकरे गटाच्या शिवसेनेचा व्हीप आम्ही मानणार नाही, असं शिंदे गटाने स्पष्ट केलं. त्यानंतर शिंदे गटातले सर्व आमदार आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आले. यावेळी मतदान झालं, त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पक्षादेशाचं उल्लंघन केलेल्या आमदारांची नावे नोंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ठाकरे गट हीच शिवसेना आणि त्यांचा व्हीप अधिकृत हे विधानसभेनेही मान्य केल्याचं दिसून आलं.
जेवढा मान, तेवढीच मोठी जबाबदारी - अजित पवार
जेवढा मान असतो, तेवढीच मोठी जबाबदारी असते. त्यामुळे तुमच्या कार्यकाळात कामकाज प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. असं म्हणत अजित पवार यांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलं आहे.
पक्षादेशाचं उल्लंघन करणाऱ्यांची नावे नोंद करण्याचा आदेश
शिवसेनेच्या ज्या सदस्यांनी पक्षादेश विरोधात मत दिले त्यांची नावे नोंद करण्यात यावा असा आदेश उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला. याबाबतचे पत्र शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी गटनेता म्हणून उपाध्यक्षांना दिले होते
राहुल नार्वेकर विजयी
भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिंदे सरकारने एक मोठी लढाई जिंकली आहे. राहुल नार्वेकर हे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत.
राजन साळवींना १०७ मतं
मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने आता मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना मतदान केलं आहे. राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत.
राहुल नार्वेकरांना बहुमत
राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान, बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसेने राहुल नार्वेकरांना मतदान केलं आहे. भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झालं आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आवाजी मतदानाऐवजी सदस्यांच्या मागणीनुसार मत विभाजनाने होणार
राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव दिला असून त्याला गिरीश महाजनांनी अनुमोदन दिलं आहे. तर चेतन तुपेंनी राजन साळवींचा प्रस्ताव दिला आहे. संग्राम थोपटेंनी त्याला अनुमोदन दिलंय. दरम्यान, विरोधी पक्षांनी उभं राहून मोजणी करण्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता पोल घेतला जाणार आहे. राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव सध्या पुढे आहे. त्यासाठी ज्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचंय त्यांनी उजव्या बाजूला बसावे आणि विरोधात मतदान करायचं त्यांनी डाव्या बाजूला बसण्यास सांगण्यात आलं आहे. सध्या यासाठी वेळ दिलेला आहे.
भगवे फेटे बांधून भाजपा - शिंदे गटातले आमदार विधानभवनात
एकनाथ शिंदे सह शिवसेना आमदार भगव फेटा बांधून विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजप आमदारांनीही भगवे फेटे बांधून एकत्र प्रवेश केला आहे. त्यांनी तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आहे.
शिवसेना विधी मंडळ कार्यालय बंद
शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या सूचनेवरून कार्यालय बंद केल्याची नोटीस दरवाज्यावर लावण्यात आली आहे.
अजित पवार कोरोनामुक्त; आज कामकाजात सहभागी होणार
अजित पवार कोरोनामुक्त झाले आहे. त्यांचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे ते आता आज होणाऱ्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. २७ जून रोजी अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
शिवसेनेने जारी केला व्हीप!
या निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेने ‘व्हीप’ जारी केला आहे. प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या त्या पक्षाच्या आमदारांसाठी बंधनकारक असतो, या ‘व्हिप’चे उल्लंघन केल्यास म्हणजेच मतदानास गैरहजर राहिल्यास किंवा ‘व्हिप’च्या विरोधात उल्लंघन केल्यास संबंधित आमदारावर अपात्रतेची कारवाई होऊन त्याची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात खटके उडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Speaker Election Live)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.