Maharashtra Winter Session: आरक्षणावर सरकारची कसोटी लागणार; ७ तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन

Maharashtra Assembly Winter Session 2023 Government will be tested on the reservation Session of Legislature from 7...
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shindeesakal
Updated on

Maharashtra Winter Session: येत्या सात डिसेंबरपासून विधिमंडळाचे सत्र नागपुरात सुरू होणार आहे. आरक्षण, जातिनिहाय जनगणना व शेतकऱ्यांचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवरून सरकारची चांगलीच कसोटी लागणार असल्याचे दिसते. (Nagpur winter session)

Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Winter Session Nagpur : ''जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्याला पैसे मिळतात'', जयंत पाटलांचे गंभीर आरोप

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. (Maharashtra assembly winter session)

मंत्री छगन भुजबळ यांनी तर उघडपणे मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे. मंत्र्यांमध्ये असलेल्या मतभेदावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मराठा आरक्षणावर ठरावही आणणार असल्याची चर्चा आहे. ठरावानंतरच मराठा आमदारांकडून कोणती भूमिका घेण्यात येते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Nagpur winter session 2023)

Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Assembly Winter Session : 'फक्त टाईमपास करून वेळ मारून न्यायची...'; हिवाळी अधिवेशनाच्या कालवधीवरून विरोधकांची नाराजी

दुष्काळासह अन्य मुद्दे उपस्थित होणार

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी होत आहे. पाऊस कमी झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला.नागपूर हिवाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधान मंडळ हिवाळी अधिवेशन २०२३

हिवाळी अधिवेशन २०२३

तर १,०२१ महसूल मंडळात दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली. सर्वच महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी होत आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून अनेक सदस्यांनी हे मुद्दे उपस्थित करण्याची तयारी केली आहे.

Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर! डिसेंबरमध्ये 19 दिवस चालणार कामकाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.