Maharashtra Assembly Winter Session : आमदारांचे शस्त्र म्हणवल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना म्हणजे नेमकं काय?

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू
Maharashtra Assembly Winter Session
Maharashtra Assembly Winter Session esakal
Updated on

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे.  या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत,.नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हा सत्र विधान भवन, नागपूर येथे आयोजित केला जातो. 

Maharashtra Assembly Winter Session
Winter Friendly Food : हिवाळ्यात बनवा गूळ भाताची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

देशाचा किंवा राज्याचा कारभार कसा चालू आहे याचा आढावा घेणे म्हणजे अधिवेशन होय असे ढोबळ मानाने म्हणता येईल. हे अधिवेशन वर्षातून 3 वेला घेतले जाते तसेच विशिष्ट प्रसंगी खास अधिवेशन बोलावले जाते.उदा.उन्हाळी, पावसाळी, हिवाळी. या अधिवेशनात प्रामुख्याने विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांना विविध विषयांवर प्रश्न विचारून संबधित खात्याच्या मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पडतात. या आमदारांचे सभागृहातील सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे लक्षवेधी सूचना. ही लक्षवेधी सूचना म्हणजे नेमकं काय हेच आज जाणून घेऊ.   

Maharashtra Assembly Winter Session
Bank Holidays In 2023: महत्वाची कामे पुढल्या वर्षावर ढकलू नका; जानेवारीत एवढे दिवस बँक असणार बंद

तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी जी सूचना दिली जाते तिला लक्षवेधी सूचना म्हणतात. सुचनेत उल्लेखिलेली घटना कधी घडली त्या तारखेचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा सूचनेवी तातडी ठरविणे अवघड जाते व त्यामुळे सूचना स्वीकृत करता येत नाही तसेच हयासूचना विधानमंडळ सचिवालयातील 'ग' शाखेत (कक्ष क्र. ०१७ तळमजला) कामकाजाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यन्त देणे आवश्यक आहे.

Maharashtra Assembly Winter Session
Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

सदस्यांना सत्र सुरु होण्यापूर्वी लक्षवेधी सूचना द्यावयाच्या असल्यास, अशा सूचना अधिवेशन सुरु होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नव्हे अशा बेताने पोहचतील अशा पाठवावयाच्या असतात. तीन दिवसांपूर्वी आलेल्यासूचना विचारात घेतल्या जात नाहीत. दररोज तीन सूचना कार्यक्रमपत्रिकेवर दाखविण्यात येतात. एका सूचनेवरील चर्चेकरिता दहा मिनिटे इतका वेळ देण्यात आला आहे. सभागृहात सूचना मांडल्यानंतर संबंधित मंत्री त्याविषयी निवेदन करतात.

Maharashtra Assembly Winter Session
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

निवेदनाच्या प्रती जर अगोदर सदस्यांना वाटण्यात आल्या असतील तर मंत्रिमहोदय फक्त निवेदन प्रसृत केल्याप्रमाणे असे म्हणतात. लक्षवेधी सूचनेवर भाषण करता येणार नाही. परंतु अधिक स्पष्टीकरणासाठी एक दोन प्रश्न विचारण्याची मुभा आहे. ज्या सदस्यांची लक्षवेधी सूचना असेल त्या सदस्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण संधी मिळाल्यावरच सभापतींनी परवानगी दिल्यास इतर सदस्यांना प्रश्न विचारता येतात.

Maharashtra Assembly Winter Session
Palazzo Fashion : रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

अनेक सदस्यांनी एकाच विषयावर लक्षवेधी सूचना दिली असेल तर त्या सर्व सदस्यांची नावे त्या लक्षवेधी सूचनेस त्यांच्या सूचना कार्यालयात ज्या क्रमाने मिळाल्या असतील त्या क्रमाने जोडण्यात येतात. कार्यक्रमपत्रिकेवर ज्या क्रमाने नावे दाखविली असतील त्या क्रमाने सदस्य (एक गैरहजर असल्यास दुसरा) सूचना मांडू शकतात. सर्वच गैरहजर असल्यास सूचना मांडली जात नाही त्यामुळे त्यावर निवेदन होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.