राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांत सर्वकाही आलबेल आहे, अशी काही परिस्थिती नसल्याचे त्यांच्याच वक्तव्यावरून दिसून येते. याचाच धागा पकडत ‘कोण कोणास म्हणाले’ या नावाखाली महाविकास आघाडीने केलेली बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
भाजपच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याबरोबरील सत्तास्थापनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अधून मधून याबाबत वक्तव्यही केले जाते. याचा संदर्भ घेत ‘मला शिंदेंबरोबरचा भाजप आवडत नाही, मला अजित दादांबरोबरचाही भाजप आवडत नाही, मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो, असे विधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. मात्र, या नेत्याचे थेट नाव न घेता अधीर (सुधीर) भाऊ यांच्या नावाने हे बॅनर झळकावून भाजपमधील अस्वस्थतेवर बोट ठेवण्यात आले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले. याच काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंगी झाला होता. त्याबाबतचे ट्विटही त्यांनी केले होते. याबाबत उलटसुलट चर्चाही झाली. याचा संदर्भ घेत ‘मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंगी झाला.’ पवार यांच्या डेंगीबाबत संभ्रम निर्माण करणारे हे विधान (रामाचे दास) कोणी केले, यावर बराच काळ सभामंडपात चर्चा सुरू होती.
वारंवार घोषणा करूनही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही. शिंदे गटातील अनेक आमदार हे मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वारंवार घोषणाही केल्या जातात. याचाच संदर्भ घेत ‘सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री कर’ (गोगो मास्टर) या बॅनरची व संबंधित आमदारांच्या ‘उत्साहाची’ चांगलीच चर्चा रंगली. (Marathi Tajya Batmya)
मुख्यमंत्रिपदावरूनही टोमणेबाजी
एकनाथ शिंदे यांचे ‘मीच मुख्यमंत्री,’ अजित पवार यांचे ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय’ तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘देवाभौच होणार मुख्यमंत्री,’ ही राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत असणारी विधानेही बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.