"आता मराठा आयोग..."; राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरुन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. अध्यक्षांसह तीन ते चार सदस्यांनी देखील राजीनामा दिल्यामुळं त्यांच्यावर सरकारचा दबाव असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Maharashtra Backward Class Commission Chairman resigns Chhagan Bhujbal Bhujbal ask question to Govt)

Chhagan Bhujbal
Bhajanlal Sharma: पहिल्यांदा आमदार अन् भाजपनं थेट CM केलं...कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?

भुजबळ म्हणाले, कुठूनतरी दबाव आल्याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामा देणार नाहीत. कदाचित मराठा आयोग आणण्याच्या हालचाली सुरु असतील. या आयोगात असलेल्या लोकांना त्यांची अडचण असेल त्यांचे मतभेद असतील म्हणून त्यांनी राजीनामा दिला असेल. मला सुद्धा हा प्रकार मोठा गुढ वाटतोय. कारण आगोदर अॅड. किल्लारीकर, त्यानंतर हाके, मेश्राम, निरगुडकर, तरवाडकर यांनी राजीनामे दिले आहेत.

Chhagan Bhujbal
"आता मराठा आयोग..."; राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरुन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

नेमका दबाव काय आणला?

हल्लीच्या काही गडबडींमध्ये ही काही तीन-चार लोकं आहेत त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळं आता संपूर्ण आयोगाचाच राजीनामा झालेला आहे. याच्यामागे काहीतरी कारण आहे. ही सर्व मंडळी स्पष्टपणे बोलत नाहीत कचरताहेत की कशामुळं त्यांच्यावर दबाव आला. म्हणतात दोन मंत्र्यांचा दबाव आला. (Marathi Tajya Batmya)

सरकारचा दबाव आला पण म्हणजे नेमका काय दबाव आला? कशासाठी दबाव आला? हे त्यांनी सांगितलं पाहिजे. पण हे निश्चित आहे की कुठुनतरी दबाव आल्याशिवाय हे लोक राजीनामा देणार नाहीत. अध्यक्ष हे हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal
Old Pension: राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या हालचाली? अजित पवारांनी सभागृहात स्पष्ट सांगितलं

आता मराठा आयोगाबद्दल निर्णय घ्यायचा असेल

कदाचित आता मराठा आयोगाबद्दल काही निर्णय घ्यायचे असतील आणि त्यांना निरगुडेंचं आयोगात असणं मान्य नसेल म्हणून काही नवे लोक भरायचे असतील. काय आहे ते आता लोकांच्यासमोर येईलच. मला सुद्धा या सदस्यांनी सांगितलेलं नाही, मी त्यांना सांगितलं राजीनामा देऊ नका. पण नेमकं काय झालंय ते मलाही ते सांगत नाहीएत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.