औरंगाबाद - शहरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.
बेस्टच्या ८ बसेसची तोडफोड
बेस्ट च्या ८ बस ची रात्री १२ नंतर तोडफोड झाल्याची माहिती समोर येत आहे. काही तुरळक बस फेऱ्या सुरू आहेत. पोलीस संरक्षण मिळाल्यास इतर फेऱ्या देखील सुरू केल्या जाणार असल्याच प्रशासनाच म्हणणं आहे. बेस्टच्या काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काही आगरामधून बस सुरु नाहीत.
महाराष्ट्र बंद - पुणे-बंगळूर हायवेवर शिवसैनिकांचा रास्तारोको
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज कोल्हापुरात शिवसैनिक सकाळीच रस्त्यावर उतरले आहेत. येथील पुणे-बंगळूर महामार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दहा ते पंधरा मिनिटं शिवसैनिकांनी हा महामार्ग रोखला होता. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर महामार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
ठाणे - महाराष्ट्र बंदमुळे रिक्षासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.
पुणे - शहरातील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत तसेच गुलटेकडी येथील घाऊक भाजीपाला बाजार देखील बंद आहे. रिक्षा वाहतूक ही पूर्णपणे बंद असल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले.
पुणे - दुकाने हॉटेल्स तसेच रिक्षा आणि पीएमपीची वाहतूक सोमवारी सकाळपासूनच बंद झाली त्यामुळे पुण्यात बंदला सकाळी पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
मुंबई - महाराष्ट्र बंदला मुंबईत प्रतिसाद मिळत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. वाहनांची वर्दळसुद्धा कमी आहे.