Maharashtra BJP Meeting
Maharashtra BJP MeetingEsakal

BJP Meeting: महायुती की स्वबळावर? भाजपच्या बैठकीत काय निर्णय होणार? निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्या

Vidhan Sabha Election 2024: राज्यात पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
Published on

राज्यात पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांची मालिका सुरू आहे. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात भाजपची मोठी बैठक होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजपची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी, सहप्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागावाटपाबाबत तसेच निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी मुंबईत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यावेळी महाराष्ट्र विधानसभा आणि बीएमसी निवडणुकांबाबत चर्चा झाली होती.

Maharashtra BJP Meeting
EWS: मराठा विद्यार्थांना आता EWS मधून अर्ज करता येणार नाही! आयोगाने काढले नोटिफिकेशन, सदावर्तेंचा दावा

लोकसभेत महायुतीला फटका

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतील मोठा फटका बसला होता. राज्यातील 48 जागांपैकी महायुतीला अवघ्या 17 जागी विजय मिळाला होता. यामध्ये भाजपची 23 खासदारांवरून 9 खासदारांवर घसरण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली होती.

दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत 30 जगांवर विजय मिळवला होता. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13, ठाकरेंच्या शिवसेनेने 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुकीतील ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यात पुन्हा भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची बैठक असल्याची चर्चा आहे.

Maharashtra BJP Meeting
IAS अधिकाऱ्यांची पहिलीच आषाढी वारी, तरी एक नंबर नियोजन! जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे व पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे कौतूक

विधान परिषदेच्या निकालाने महायुतीला दिलासा

गेल्या आठवड्या राज्यातील 11 जागांवर विधान परिषद निवडणुका झाल्या. यामध्ये महायुतीने 9 जागी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात अवघ्या 2 जागा पडल्या.

महायुतीला मिळालेल्या या मोठ्या विजयामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिलासा मिळाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.