आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन

आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन
Updated on

कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिराचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र, मंदिरं बंदच ठेवली. त्यामुळेच भाजपने आज, सोमवारी राज्यभर शंखनाद आणि घंटानाद आंदोलन पुकारल आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. मंदिरं पुढील आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही जाल्याचं पाहायलं मिळालं. औरंगाबाद, पंढरपुर आणि पुण्यातील मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे धुमश्‍चक्री पाहायला मिळाली.

कसबा गणपती मंदिराबाहेर आंदोलन -

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा गणपतीच्या मंदिराच्याबाहेर शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केलं. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचेही बोललं जात आहे.

आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन
रात्रीची कडक संचारबंदी लागू करणार, राजेश टोपेंचा इशारा

उद्धवजी, लोकांचे शाप घेऊ नका - पाटील

"दोन वर्ष वारी नाही म्हणजे काय? वारकऱ्यांना विचारा. आज संपूर्ण महाराष्ट्रात शंखनाद आंदोलन सुरु आहे. यांना दारुच्या दुकानांचा आवाज ऐकू येतो" अशी टीका पाटील यांनी केली. "मंदिर उघडली नाही, तर लोक आपल्या भावना दाबून ठेऊ शकणार नाही. मंदिराची कुलूप तोडली जातील. मंदिरात जायचं तर मातोश्रीत जायच का? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही" असे पाटील म्हणाले. संध्याकाळी ऑर्डर काढा. आजपूसन प्रवेश सुरु करा. दर्शनानंतरच आंदोलनाची सांगता होईल, असे पाटील म्हणाले. "उद्धवजी होश में आओ, होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका" असे पाटील म्हणाले.

आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन
यात्रांमुळे बाधितांची संख्या वाढणार, अजित पवारांची केंद्रावर टीका

विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री!

पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) व भाजप आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Awtade) यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यामुळे पुढचा अनर्थ टळला.

आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन
MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

रामकुंडावर शंखनाद -

‘मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे’ अशी हाक देत भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीने आजच्या गोकुळाष्टमीच्या (gokulashtami) पार्श्‍वभूमीवर राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली. मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्येही आध्यात्मिक आघाडीतर्फे रामकुंडावर आंदोलन करण्यात आले.

'अधर्मी वागू नका, आजतरी मंदिरे उघडा'

आज जन्माष्टमी आहे. हिंदूंचा सण आहे. त्यामुळे आज काहीतरी भूमिका घ्या आणि मंदिरे उघडा, असे भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज नागपुरातील कोराडी परिसरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन (BJP agitation) करण्यात आले.

आठवडाभरात मंदिरं उघडा; भाजप आक्रमक, राज्यभर शंखनाद आंदोलन
पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी आजच करा अर्ज

मंदिरात जाऊन घोषणाबाजी -

औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिरासमोर भाजपच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी संभळ, शंखनाद वाजवण्यात आला. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तरी काही महिलांनी मंदिरात जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी आमदार अतुल सावे, संजय केनेकर, प्रवीण घुगे, प्रमोद राठोड, भाजप आध्यत्मिक आघाडीचे प्रमुख संजय जोशी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाजपने आंदोलन केलं. यावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. शिर्डी, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा आणि अमरावतीतही भाजपच्या वतीने घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.