Maharashtra BJP: भाजपमध्ये कोणाची विकेट पडणार? "अप्रिय निर्णयासाठी तयार राहा," पक्षश्रेष्ठींचा राज्यातील नेत्यांना इशारा

Vidhan Sabha Election: "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अप्रिय निर्णयांना आणि बदलांना सामोरे जाण्यास तयार राहा," असे भाजपश्रेष्ठींनी कोअर कमिटीच्या काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.
Maharashtra BJP
Maharashtra BJP Esakal
Updated on

विधानसभेला सामोरे जाताना महायुतीतील मित्रपक्षांचा योग्य आदर राखला जाईल. मात्र, भाजप कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ न देण्याचे ठरविण्यात आले आहे. महायुतीत भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

"विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अप्रिय निर्णयांना आणि बदलांना सामोरे जाण्यास तयार राहा," असे भाजपश्रेष्ठींनी कोअर कमिटीच्या काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.

दरम्यान, 'भाजयुमो'चे प्रदेशाध्यक्ष राजेश लोणीकर यांनी मतदारसंघावर लक्ष द्यायचे आहे सांगत आज राजीनामा दिला, त्यामागे बदलाची गरज हे खरे कारण होते काय अशी चर्चा सुरू आहे. अनुप मोरे यांना 'भाजयुमो'चे प्रदेशाध्यक्ष नेमून त्यांची जागा भरण्यात आली. हा बदल फक्त 'भाजयुमो 'पुरताच आहे की त्यातून अन्य पदाधिकाऱ्यांना काही संदेश द्यायचा आहे, अशी चर्चाही सुरू होती.

राजेश लोणीकर यांना काल लगेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिटणीसपदी नेमले. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज (ता. १२) रात्री होणार होती, मात्र ती काल झाली.

Maharashtra BJP
Anil Deshmukh: वाझे व परमवीरला फडणवीसांनी उभे केले, अनिल देशमुखांचा आरोप !

केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यातील परिस्थितीचा तसेच गेल्या दोन महिन्यांतील संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला.

आज (ता. १२) भाजपचे आमदार असलेल्या १०५ मतदारसंघातील मतदारवाढ, बूथरचना यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरून संघटनमंत्री बी. एल. संतोष या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत.

Maharashtra BJP
Maratha Reservation : मुंबईत जाऊन माज उतरवू; पुण्यातील शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे-पाटील राजकीय नेत्यांना इशारा

अचानक दिवस बदलून झालेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करायला माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते.

घटनाबदलाचे फेक नरेटिव्ह आता मतदारसंघात पोहोचले आहे. दलित, महिला, युवक या गटातील प्रतिसादाची चर्चाही या बैठकीत सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.