Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपला मिळणार नवीन प्रभारी, संघटनमंत्रिपदही रिक्तच

devendra fadnavis
devendra fadnavisesakal
Updated on

मुंबईः सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची धांदल निवळली की लगेचच महाराष्ट्र भाजपला नवा प्रभारी मिळण्याची शक्यता आहे. गेले काही महिने प्रभारी आणि भाजपच्या व्यवस्थेत अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले संघटनमंत्रिपद रिक्त आहे. ४८ लोकसभा मतदारसंघ असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे असून तेथे कोण प्रभारी नेमला जाईल, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

यापूर्वी छत्तीसगडमधील सरोज पांडे, कर्नाटकातील सी.टी.रवी अशा तरुण नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारीपद देण्यात आले होते. हे नेते तसे दुसऱ्या फळीतील असले तरी प्रभावी होते. शिवसेनेने (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षाशी फारकत घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे आयाम बदलले आहेत.

devendra fadnavis
Sakal Swasthyam 2023 - Gauri Sawant Interview : “मनाची दारं उघडी ठेवा”, श्रीगौरी सावंत यांची प्रेरणादायी मुलाखत

केंद्रातील सत्ता राखण्यासाठी महाराष्ट्रात किमान ४२ जागा जिंकणे आवश्यक मानले जाते आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट तसेच नव्या भिडुंमुळे विशेषत: अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाल्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेत त्यांना समवेत ठेवण्यासाठी संघटनमंत्री या पदावर कुणाची तरी गरज आहे, असे मानले जाते.

प. बंगालातील निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांना महाराष्ट्राचे प्रभारी केले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, ते आता मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत उमेदवार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनातील नाव भाजप पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांच्याशी चर्चा करून अंतिम होईल, असे मानले जाते.

devendra fadnavis
Sakal Swasthyam 2023 - Gauri Sawant Interview : “मनाची दारं उघडी ठेवा”, श्रीगौरी सावंत यांची प्रेरणादायी मुलाखत

प्रबोधिनीत निवडणुकीच्या तंत्रावर मंथन

दरम्यान, महाराष्ट्रात नेमलेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघप्रमुखांची दोन दिवसांची बैठक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सुरु झाली आहे. ही बैठक दोन दिवस चालेल. निवडणुकांचे तंत्र काय असेल यापासून तर जिंकण्यासाठी काय करायला हवे, याबद्दलची मार्गदर्शनपर भाषणे येथे सुरु आहेत. आज महाविजय अभियानाचे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी तसेच मुंबई विभागीय अध्यक्ष आशीष शेलार यांची भाषणे झाली. उद्या (ता. २२) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.