HSC Result 2023: बुलढाणा घटनेसाठी सर्वांचे निकाल अडवता येणार नाही, शिक्षण खात्याने केले स्पष्ट

Maharashtra Board HSC Result 2023
Maharashtra Board HSC Result 2023esakal
Updated on

Maharashtra Board HSC Result 2023: राज्याचं लक्ष लागून असलेला १२वीचा निकाला आज (गुरूवारी) दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. दरम्यान बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील केंद्रावर गणिताचा पेपर फुटी प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली होती.

पेपर फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. यात दोन शिक्षकांचा समावेश होता. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maharashtra Board HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर; निकालाचे सर्व अपडेट पहा एका क्लिकवर

या प्रकरणाची गांभीर्यता बघता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात एक एस.आय.टी. समिती स्थापन केली.

परंतु एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच अटक करण्यात आलेले आठ संशयित आरोपी हे जामीनावर सुटले आहेत. या सर्व प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येऊनही त्यांचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात का ठेवला गेला आहे. (Marathi Tajya Batmya)

विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती मात्र बुलढाण्यातील भारत विद्यालय केंद्रप्रमुखात असलेले शिक्षक घोंगटे यांनी पेपर फुटल्याची व पेपर सुरू असताना माध्यमांच्या कॅमेरासमोर पेपर दाखवूनही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही.

Maharashtra Board HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? फोटोकॉपी साठी मुदत किती? जाणून घ्या सर्व माहिती

निकाल राखून ठेवता येत नाही - शिक्षण मंडळ

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. (Latest Marathi News)

यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना गाेसावी यांनी बुलढाणा येथे झालेल्या प्रकाराची चौकशी केली गेली. या प्रकरणात ६ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यावर कार्यवाही होईल. परंतु विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवता येत नाही असेही गाेसावी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()