Maharashtra Board : पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ; दहावीचे ३६.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत ३२.४६ टक्के, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३६.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Maharashtra Board
Maharashtra Boardsakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत ३२.४६ टक्के, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३६.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील ५९ हजार २०० विद्यार्थ्यांनी बारावीची पुरवणी परीक्षा दिली, त्यातील १९ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३१ हजार २७० विद्यार्थ्यांनी दहावीची पुरवणी परीक्षा दिली, त्यातील ११ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.