Maharashtra Breaking News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi 17 July 2024: आज आषाढी एकादशीचा उत्साह राज्यात आहे. तब्बल १० लाख वारकरी पंढरपुरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जमा झाले आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

Bandra-Worli Sea Link live: वांद्रे-वरळी सी लिंक वरून ५० वर्षीय व्यक्तीची उडी मारून आत्महत्या

वांद्रे-वरळी सी लिंक वरून ५० वर्षीय भावेश शेठ नावाच्या व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. भावेश शेठ हे घाटकोपरचे रहिवाशी होते आणि त्यांनी आर्थिक अडचणीतून हे पाऊल उचलल्याचे समजते. पोलिसांनी सी लिंक वरून एक सुसाईड नोट जप्त केली असून, उडी मारण्यापूर्वी भावेश शेठ यांनी आपल्या मुलाला फोन केला होता. वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि या घटनेचा तपास सुरू आहे.

Mumbai Goa National Highway live: मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा 2 दिवसासाठी मेगाब्लॉक

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या दोन दिवस दिवसातून 4 तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आलीय. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.

Mumbai news live: अवघ्या ५ दिवसात विमानतळावर १८ कोटींची तस्करी उघड

अवघ्या पाच दिवसात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचे २४ गुन्हे नोंद झाले. या कारवायांमध्ये हवाई गुप्तचर विभागाने ८.३४ कोटी रुपयांचे सोने, ४४ लाख रुपयांचे परकीय चलन आणि सुमारे १० कोटी रुपयांचे आयफोन, लॅपटॉप, सिगारेट, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तू जप्त केल्या. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Navi Mumbai Crime: एमडी तस्करीतील मुख्य आरोपीस वाशीतून अटक

एनसीबीची कारवाई

मुंबई - रासायनिक अमली पदार्थांमध्ये सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या मेफड्रॉनच्या(एमडी) तस्करीतील मुख्य आरोपी सुफियान खान याला केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) सोमवारी वाशीतील एका हॉटेलमधून अटक केली.

Maratha Reservation Live : उद्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक...

मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी उद्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शांतता महारॅलीची तारीख जाहीर होऊ शकते. तसेच २० तारखेला जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा सरकारला इशारा दिला आहे. उपोषणापूर्वीच जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे उद्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा समन्वयक अंतरवाली सराटी मध्ये येणार आहेत.

Ashadhi Wari Live : पंढरपूरला गेलेल्या 70 वर्षीय वारकऱ्याचा हिंगोलीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...

हिंगोलीच्या गोंडाळा येथील पंढरपूरला गेलेल्या 70 वर्षीय वारकऱ्याचा एसटीमध्ये परतीच्या प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामराव रहाटे अस या वारकऱ्याचे नाव असून पंढरपूरवरून एसटी बस मध्ये परत येत असताना भानखेडा गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Satara Live : साताऱ्यातील संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे झाली दाखल

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छ.शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल झाली आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून कोणालाही आत मध्ये प्रवेश दिला जात नाही. 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे .

Nagpur Rain Live : नागपूरातील अनेक भागात विजांचा कडकडाटसह पाऊस

नागपूरात मागील अर्धातासापासून शहरारातील अनेक भागात विजांचा कडकडाटसह पाऊस सुरू आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यादरम्यान शहरात काळोख पसरला असून हवामान विभागाकडून चांगला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Bhandara live: गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले...

जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले

Dhule: प्रति पंढरपूर बाळदे येथील विठ्ठल मंदिर परिसरा भाविकांची रिघ

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिग बघावयास मिळत आहे. या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त यात्रेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले

Devendra Fadnavis Live Update: पोलाद प्रकल्पाचा स्थानिक लोकांना आणि आदिवासींना खूप फायदा होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही गडचिरोलीतील पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून केले आहे. यामुळे येथील स्थानिक लोकांना आणि आदिवासींना खूप फायदा होणार आहे.

Ajit Pawar Live Update: गडचिरोलीत सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Ajit Pawar
Ajit PawarSakal

अजित पवारांची नागपुरात होणारी बैठक रद्द

नागपुरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची ही कार्यकारणी बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Live Update : लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनापूर्वी जमा होणार, अजित पवाराची घोषणा

लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनापूर्वी जमा होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur Live Update : अजित पवार, फडणवीस थोडक्यात बचावले, खराब हवामानामुळे भरकटले हेलिकॉप्टर

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज थोडक्यात बचावले. त्यांच्यासोबत असलेले उद्योगमंत्री उदय सामंत, पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले.खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची ऑगस्टमध्ये होणार नियुक्ती

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार आहे. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमुळं महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. अखेर ऑगस्ट महिन्यात ही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

काँग्रेसच्या ७ आमदारांवर १९ जुलैपूर्वीच कारवाई करा; पटोलेंची खर्गेंकडं साकडं

विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग करुन पक्षविरोधी काम करणाऱ्या ७ आमदारांवर १९ जुलैपूर्वीच कारवाई करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या आमदारांवर कारवाई करुन पक्षात कडक संदेश देण्याची मागणीही त्यांनी केली.

Amravati Live : अमरावतीत अजगरानं गिळला कुत्रा!

अमरावतीच्या धामणगावात अजगरानं एका कुत्र्याला गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. धामणगाव रेल्वे शहरातील जेबी पार्क मध्ये ही घटना घडली आहे. 12 फूट लांब आणि 20 किलो वजनाच्या अजगरानं श्वानाला गिळलं आहे. सर्पमित्राच्या मदतीनं मृत श्वानाला अजगराच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळतात वनविभाग घटनास्थळी दाखल झालं. अजगराला पकडून वनविभागानं जंगलात सोडलं.

TVM Canal Mishap Live : टीव्हीएम कालवा दुर्घटनेप्रकरणातील आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

टीव्हीएम कालवा दुर्घटनेप्रकरणी तिरुअनंतपुरमच्या महापौर कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेस आणि मुस्लिम युथ लीगच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Sharad Pawar Live : अजित गव्हाणे शरद पवार यांच्या गोटात

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवार गटात त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सामील झाले. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख अजित गव्हाणे यांचाही पक्षात प्रवेश झालेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.

Maharashtra Governor Nominated 12 Mla Live : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्ट मध्ये होणार

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमुळे , महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. अखेर ऑगस्ट महिन्यात ही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Supriya Sule Live : तुम्ही हा प्रश्न भाजप आणि आरएसएसला विचारला पाहिजे - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिकातील एका लेखावर म्हटंल्या तुम्ही हा प्रश्न भाजप आणि आरएसएसला विचारला पाहिजे, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा कसा आहे?

Chhatrapati Sambhajinahgar Kamband Andolan : पैठण, वैजापूरला महसूल कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना व शाळा-महाविद्यालये प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यास तहसील कार्यालयात मोठी गर्दी असतानाच सोमवार (ता.१५) पासून पैठण, वैजापूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे महसूल यंत्रणा कोलमडली आहे.

Bihar Live : बिहारमध्ये एका वृद्ध जोडप्याची चाकूने भोसकून हत्या

बिहारमध्ये एका वृद्ध जोडप्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे, डीएसपी चकिया सत्येंद्र कुमार सिंग यांना माहिती मिळाली की मिथनपुरा गावात बथू साहा (वय 70 वर्षे) आणि मानती देवी (वय 65 वर्षे) या दोन लोकांना चाकूने भोसकण्यात आले आहे. या दोघांची हत्या घरगुती वादातून झाली आहे. याप्रकरणी पवन शहा याला पोलिसांनी अटक केली आहे.

Matang Community Live: राज्यात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे.

मातंग समाजासह मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा या समाजाच्या विकासासाठी स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलीये.

Satara-Mahabaleshwar Accident Live:: सातारा-महाबळेश्वर रोडवर अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण जखमी

सातारा-महाबळेश्वर रोडवर भीषण अपघात झाला आहे. कार वेण्णा पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली आहे. यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Live: अजित पवार आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Ajit Pawar-Devendra Fadanvis Live: दोन्ही उपमुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी ती विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

Ajit Pawar workers Live: अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांचा आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडमधील ४ पदाधिकारी आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज हे पदाधिकारी पक्षात प्रवेश करतील. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

J&K tightened security Live: अमरनाथ यात्रेसाठी दुसरी बॅच रवाना, सुरक्षा व्यवस्था वाढवली

अमरनाथ यात्रेच्या निमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यात्रेकरूंची दुसरी टीम यात्रेसाठी निघाली आहे. त्यामुळे भारतीय लष्कर खरबदारी घेत आहे. गेल्या काही दिवसांत दहशतवादी कृत्य घडले आहेत.

Sharad Pawar Live: शरद पवारांची आज १२ वाजता पत्रकार परिषद

आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. काल त्यांची भेट सुनेत्रा पवार यांनी घेतली होती. त्यामुळे ते आज काय बोलतील का? हे पाहावं लागणार आहे. इतर विषयांवर देखील ते महत्त्वाचं बोलण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com