Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: देश-विदेश आणि महाराष्ट्रातील विविध ताज्या घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

Bhushi Dam Live: भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला

भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या कुटुंबातील आणखी एकाचा मृतदेह सापडला असून, आजची शोध मोहिम थांबवण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

NCP Meeting Live: देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरवात

अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरवात झाली आहे. बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांची नाव होणार निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अनिल पाटील उपस्थित.

Ashadhi Wari Live: तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं दोन दिवसांच्या मुक्कमासाठी आज पुण्यात आगमन झाले.

Sujata Sounik Live: राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी स्वीकारला पदभार

राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला. सुजाता सौनिक १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव होते.

Tukaram Maharaj Palakhi
Tukaram Maharaj PalakhiEsakal

Sambhaji Bhide Live: देहू संस्थांनच्या वतीने संभाजी भिडेंचा सत्कार

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथात शिवाजीनगर बँक ऑफ महाराष्ट्र समोर संभाजी भिडे गुरुजी बसले होते. देहू संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. काही वेळ त्यांनी रथाचे सारथ्य केले.

Wari 2024 Live : विविध मागण्यासाठी राज्यातील होलार समाज आक्रमक; आषाढीला मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा

विविध मागण्यासाठी राज्यातील होलार समाज आक्रमक झाला असून आषाढीला मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. होलार समाजाची पंढरपुरात राज्य स्तरीय बैठक पार पडली यामध्ये होलार समाजाचा अभ्यास करण्यासाठी आयोग स्थापन करावा, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अन्यथा आषाढीच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांना रोखणार असा इशारा देण्यात आला. ऐन आषाढी यात्रेत होलार समाजाचे आंदोलन करणार असून समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Ajit Pawar Live : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार असून अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणआर आहे. ज्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांची नाव निश्चित होणार आहेत. राजेश विटेकर यांच नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. तर दुसरा उमेदवार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

Jammu Kashmir Live : रियासी दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात जम्मू-काश्मीरमध्ये NIA चे छापे

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने रविवारी रियासी दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात हायब्रीड दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर शोध घेतला. एनआयएने दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू यांच्यातील संबंध असलेल्या विविध वस्तू जप्त केल्या. दहशतवादी कटाचा उलगडा करण्यासाठी एनआयएने जप्त केलेल्या साहित्याची तपासणी सुरू केली आहे.

Mumbai Rain Live : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! 

नवी मुंबई परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. नवी मुंबईतील सर्वच भागात पावसाचा जोर पहायला मिळत असून ऐरोली आणि दिघा विभागात अधिक पाऊस झालाय तर बेलापूर विभागात कमी पावसाची नोंद झालेय.

नवी मुंबईत मागील 24 तासात झालेल्या पावसाचा तपशील.

बेलापूर - 09.80 mm

नेरुळ - 13.20 mm

वाशी - 21.40 mm

कोपरखैरणे - 18.00 mm

ऐरोली - 29.80 mm

दिघा - 25.20 mm

Nashik-Mumbai Highway: तिसऱ्या दिवशीही मुंबई-नाशिक महामार्ग जाम, पूलाच्या कामाचा मनस्ताप

मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद व आसनगाव या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने उड्डाण पूलाच्या कामाचा मनस्ताप मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना होत असून दररोज या ठिकाणी 5 किलोमीटर च्या लांबच लांब रांगा लागत असल्याने महामार्ग प्रवाशांसह स्थानिक जनतेला सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Rain Update Live: मनमाड परिसरात पावसाला सुरूवात, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला काहीसा दिलासा

आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मनमाडसह परिसरात हजेरी लावली. या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मध्येच काही काळ ऊन पडल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. त्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Aashadhi Wari Live: संभाजी भिडेंनी घेतले जंगली महाराज मंदिरात दर्शन

आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होणार आहे. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत.

Jyoti Mete Live: 'मी विधानसभा निवडणूक लढवणार', ज्योती मेटेंनी केला विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त संकल्प

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न काहीसं पूर्णत्वास जात आहे, मात्र शिवस्मारकाचे स्वप्न अद्यापही अधुरे आहे..त्यामुळं त्यांचा इच्छा अन स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.. असा संकल्प आणि निर्धार दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या पत्नी आणि शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे यांनी केला आहे..

आज दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांची जयंती आहे आणि या निमित्ताने बीड जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये, लोकनेते विनायकराव मेटे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या निमित्ताने डॉक्टर ज्योती मेटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी

Ashadhi Wari Live: सुप्रिया सुळेंनी घेतले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन

तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. राज्य सरकार तर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिला जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पळत राहणार.

Jairam Ramesh : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी सरकारने संविधानात दुरुस्ती करावी; काँग्रेसची मागणी

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी सरकारने संविधानात दुरुस्ती करावी अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी असल्याचे वक्तव्य कॉंग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केले आहे.

Gautam Gambhir : माजी क्रिकेटपटू अन् भाजप नेता गौतम गंभीरने घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे माजी नेते गौतम गंभीर यांनी नुकतीच आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शन घेऊन पूजा केली आहे.

Mumbai Latest Update: सायन रेल्वे पुल जड वाहतुकीसाठी  बंद

सायन रेल्वे स्थानकासमोर ११० वर्षे जुना पुल जड वाहतुकीसाठी काल रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्वाचा पुल आहे.

Sharad Pawar: शेकाप नेते जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली.

Satara Live Update: खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम

सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम झाली आहे. भल्यापहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या आहेत.

Water Problem: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई,नागरिकांचे हाल

मराठवाड्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरीही 1479 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हीच टँकरची संख्या आठ दिवसापूर्वी 1700 च्या वर होती.

Pune Palkhi Live: पुण्यात तुकोबा- ज्ञानोबा पालखींची भेट होणार

पुण्यात आज तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखीची भेट होणार आहे. यासाठी पुणे सजले असून वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आला आहे.

Khambatki Ghat Live: खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी

खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी घाटात एक गाडी बंदी पडली आहे.

Tamhini Ghat Live: ताम्हिणी अभयारण्यात ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी

ताम्हिणी अभयारण्यात ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

Pune Indrayani River Live: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

पुण्यातील इंद्रायणी नदीचे पाणी पुन्हा फेसाळल्याचं दिसत आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी पाहणी करून स्वच्छेतेच्या सूचना दिल्या होत्या. पण, त्यांची पाठ फिरताच जैसे थे परिस्थिती आहे.

Mumbai Rain Update Live: मुंबईत सोमवारी अतिवृष्‍टीचा इशारा

मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, सध्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत आहेत. सोमवारी (ता. १) अतिवृष्टीचा अंदाज असून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. संभाजीनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com