Budget 2023 : कोणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; अजित पवारांनी सांगितली आकडेवारी

दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.
Ajit pawar
Ajit pawaresakal
Updated on

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पेटताना दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला आहे. तसंच कोणाच्या सरकारच्या काळामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याविषयी माहिती दिली आहे.

अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षात ५०६१, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०१९ ते २०२१ या अडीच वर्षात १६६० तर एकनाथ शिंदे आल्यापासून फक्त सात महिन्यांमध्ये १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मला तुलना करायची नाही. पण कोणत्याही सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होणे वाईट आहे."

Ajit pawar
Budget 2023 : जातीशिवाय खत नाही; सांगलीतल्या प्रकारावर CM शिंदे म्हणाले, "केंद्राला कळवतो..."

ठोस मार्ग काढणं गरजेचं आहे, असं सांगताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे. दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. बीडमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी मी भाषण ऐकायचो की ३०२ चा गुन्हा दाखल करा. मात्र ३०२ चा गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर मार्ग काढला पाहिजे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.