Maharashtra Budget 2024: औंधमध्ये एम्स!अजितदादांच्या बजेटमध्ये पुण्यासाठी घोषणांचा पाऊस, रिंगरोडसाठी केली खास तरतूद

Maharashtra Budget 2024 Marathi News : नागपूर एम्सच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024Esakal
Updated on

Maharashtgra Budget 2024 : पुण्यातील औंध इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट मांडताना त्यांनी ही घोषणा केली. नागपूर एम्सच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. (maharashtra budget 2024 AIIMS will be established in Aundh in Pune on lines of Nagpur announced by Ajit Pawar)

Maharashtra Budget 2024
गगनयानासोबत अंतराळात जाणारे पायलट्स कोण?

नवीन शासकीय रुग्णालये उभारणार

वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, वाशिम, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथं १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय रुग्णालय तसेच ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2024
Eknath Shinde on Manoj Jarange: जरांगेंच्या मागण्या कशा बदलत गेल्या अन् शेवटी...; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सगळंच सांगितलं

नागपूरच्या धर्तीवर पुण्यात एम्सची स्थापना होणार

तसेच जळगाव, लातूर, बारामती, गोंदिया, नंदुरबार, मिरज इथं संलग्न १०० विद्यार्थी क्षमतेची नर्सिंग कॉलेज सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूरच्या धर्तीवर औंध पुणे इशं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे.

राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून यामध्ये वार्षिक १ लाख रुपये प्रती कुटुंबावरुन ५ लाख रुपये वार्षिक अशी करण्यात आली आहे. अंगिकृत रुग्णालयांची संख्या १ हजारावरुन १९०० करण्यात आलं आहे.

Maharashtra Budget 2024
Manoj Jarange Narco Test: मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी

पुण्यासाठी घोषणांचा पाऊस

  • पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटींचा निधी

  • जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

  • नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

  • लोणावळा इथं जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प 333 कोटी 56 लाख किंमत

  • संगमवाडी, पुणे इथं लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचं लवकरच भूमीपूजन

  • मौजे वडज, तालुका जुन्नर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

  • तुळापूर आणि वढू इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 270 कोटी रुपये किंमतीचा आराखडा, काम सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.