Maharashtra Budget 2024 : बेजबाबदारपणे मांडलेला अर्थसंकल्प - जयंत पाटील

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा फटका मोठा आहे. त्यामुळेच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता महायुतीला खात्री झाली आहे, काहीही झाले तरी आपले सरकार येत नाही.
Jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा फटका मोठा आहे. त्यामुळेच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता महायुतीला खात्री झाली आहे, काहीही झाले तरी आपले सरकार येत नाही. योजनेच्या नावाखाली पैसे वाटण्याचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे. पुढील दोन, अडीच महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे.

तेवढ्याच कालावधीत योजना राबवायच्या आहेत. योजनांबाबत नंतरचे पाहतील, या विचाराने घोषणा केल्या. पूर्णपणे बेजबाबदारपणे हा अर्थसंकल्प मांडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

ते म्हणाले, ‘महिला बालकल्याण विभागासाठी ४६ हजार कोटींची अधिकची तरतूद केली आहे. मागच्या वर्षी पुरवणी मागण्यांत या विभागाची १ लाख ३० हजार कोटीची तूट दाखवण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले याची कल्पना नाही. असे असताना, आज महसूली तूट केवळ २० हजार कोटी दाखवण्यात आली आहे.

त्यामुळे ही आकडेवारी फसवी आहे,’ असा दावा पाटील यांनी केला.पेट्रोल, डिझेलचे इतर कमी करण्याबाबतचा निर्णय असाच फसवा आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणाची प्रचिती राज्याच्या अर्थसंकल्पात दिसत असल्याचा टोलाही त्यांनी यावरुन लगावला.

जब चादर लगी फटने ....

देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात या सरकारने भरपूर घोषणा केल्या आहेत. त्यांच्या या घोषणा म्हणजे, जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, अशा प्रकारच्या असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.