Maharashtra Budget Session 2024: कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक; गोळीबार अन् गुंडगिरीविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
Maharashtra Budget Session 2024:
Maharashtra Budget Session 2024:
Updated on

Maharashtra Budget Session 2024 Marathi News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यामध्ये दोन्ही विरोधीपक्ष नेत्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सरकारविरोधात घोणबाजी देखील करण्यात आली. (Maharashtra Budget Session 2024 opposition aggressive on law and order issue protest on steps of vidhan bhavan)

Maharashtra Budget Session 2024:
Tejaswi Yadav Convoy Accident: तेजस्वी यादव यांच्या ताफ्याचा मोठा अपघात; एकाचा मृत्यू, ६ जखमी

सरकारविरोधात घोषणाबाजी

'गेली ती शिवशाही, आली ती गुंडशाही', महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण?, 'शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी', 'गुंडांना पोसणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो' असे फलक हातात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.

Maharashtra Budget Session 2024:
Mohammed Shami Surgery: शमीनं हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर, नेमकं काय झालंय? सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

हातात नकली बंदुका घेऊन निषेध

दरम्यान, विरोधकांनी यावेळी विधानभवन परिसरात नकली पिस्तूलं घेऊन आले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करताना ही पिस्तुलं रोखून त्यांनी राज्यात एकामागून एक झालेल्या गोळीबारांच्या घटनांकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेसाठी सरकारचा धिक्कार केला.

Maharashtra Budget Session 2024:
Maharashtra assembly Interim Budget session 2024: अर्थसंकल्पातील प्रत्येत अपडेट वाचा एका क्लिकवर...

फक्त बातम्यांसाठी बजेट मांडू नका - रोहित पवार

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, "तुम्ही खर्च करा लोकांपर्यंत योजना जाऊ द्या, लोकांना त्याचा फायदा होऊ द्या. नाहीतर तुम्ही केवळ बातम्या करण्यासाठी बजेट मांडणार आणि नंतर लोकांना त्याचा काहीच फायदा होणार नसले तर ते योग्य नाही, अशा पद्धतीचा मुद्दा आम्ही मांडणार आहोत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.