ओबीसी आरक्षणावरुन मंत्री भुजबळ, देवेंद्र फडणवीस आक्रमक

Chhagan Bhujbal vs Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal vs Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

OBC Reservation : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढं ढकलण्यात आल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान (Maharashtra Assembly Session) भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ओबीसीच्या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचे चित्र होते. यावेळी या दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

न्यायालयानं ओबीसी आरक्षण (OBC Reservation) नाकारलं नाही, त्यामुळं गैरसमज पसरण्याचा प्रयत्न थांबवावा. ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा मार्ग काढणं आवश्यक आहे. यासाठी सरकार देखील ठाम आहे, असं ठाणकावून सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांना स्पष्टीकरण दिलं. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, असं आमचंही म्हणणं आहे. यासाठी भाजपचा पाठिंबा आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाबाबत गैरसमज पसरु नये, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal vs Devendra Fadnavis
'राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही'

फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे, अशी आमची मागणीय. या सरकारनं जो रिपोर्ट सादर केला, त्यावर न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा डेटा करायचा होता, पण महाविकास आघाडीनं वेळ काढूपणा केलाय. बिना आरक्षणाबाबत निवडणुका घ्याव्यात, असा काही लोकांचा दबाव आहे. भुजबळ साहेबांना फक्त बोलण्याची भूमिका दिलीय. मात्र, करविता धनी दुसराच आहे. सर्व कामं पूर्ण करा, मगच निवडणुका घ्या, अशी आमची आग्रही मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.