Cabinet : ३८ जणांना मिळणार स्थान; पहा कोणाला मिळणार किती जागा

Maharashtra Cabinet 38 seats BJP Eknath Shinde
Maharashtra Cabinet 38 seats BJP Eknath ShindeMaharashtra Cabinet 38 seats BJP Eknath Shinde
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील नवीन सरकारचा विस्तार कधी होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. ११ जुलैला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचे खात्यांचेही वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. आता मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) २५ तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे १३ मंत्री राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश भाजपचे (BJP) मंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय बहुतांश मंत्री नवीन असतील. पुढील महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपला नव्या चेहऱ्यांची चाचपणी करायची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Maharashtra Cabinet 38 seats BJP Eknath Shinde
टीएमसी नेत्यासह तीन जणांची हत्या; गळाही चिरण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला नगरविकास, एमएसआरडीसी हे खात मिळणार असल्याची माहिती आहे. तसेच भाजपकडे गृह, अर्थ व महसूल खात जाणार असल्याचे समजते. यातही गृह खात हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती कालच सूत्रांकडून मिळाली होती

सरकार स्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली होती. यामुळे शिंदे गटात ८ कॅबिनेट मंत्री तर ५ जणांना राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कोट्यात काही प्रमाणात कपात होऊ शकते. सूत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपला २५ तर एकनाथ शिंदे गटाला १३ मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Cabinet 38 seats BJP Eknath Shinde
महत्त्वाचं खातेवाटप जवळपास निश्चित; कोणाकडं जाणार कुठलं खातं?

शिवसेनेला तीन आमदारांमागे एक मंत्रीपद

एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये फॉर्म्युला निश्चित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेला प्रत्येक तीन आमदारांमागे एक आणि भाजपला प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या संभाव्य अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.