शिंदे-फडणवीस सरकारचा खातेवाटपाचा मुहूर्त कधी ?

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार अखेर ४० दिवसांनी पार पडला.
maharashtra cabinet
maharashtra cabinet esakal
Updated on

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार अखेर ४० दिवसांनी पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्वांना खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खातेवाटपावर दिल्लीतूनच शिक्कामोर्तब होणार असून १५ ऑगस्ट नंतरच खातेवाटपाला मुहूर्त मिळणार आहे.(maharashtra cabinet allocation might eknath shinde devendra fadnavis)

maharashtra cabinet
महाविकास आघाडी अनैसर्गिक पटोलेंचा टोला; अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप

मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ आमदारांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडला. त्यामुळे तब्बल ४० दिवसांहून अधिक दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम लागला. दुसरीकडे मात्र शिंदे गटात सामील झालेल्या काही आमदारांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने नाराजीनाट्य सुरु झाले आहे.

कुणाला कुठलं खातं द्यायचा आणि कुठला बंगला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेणार आहेत. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न असेल.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपद स्वतः शिंदे यांच्याकडे असल्याने महत्त्वाची खाती भाजपकडे दिली जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त तसेच गृह खाते दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे महसूल, जलसंपदा, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

maharashtra cabinet
पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिले नाही; पंकजा मुंडेंच्या मनातील खदखद उघड

राज्यात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. परंतु, खातेवाटपावरुन अजूनही राज्य सरकारमध्ये गोंधळ असल्याचं चित्र आहे. यावरुन विरोधक शिंदे सरकारवर मिश्किल टीपण्णी करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही टोला सरकारला टोला लगावला आहे. दिल्लीतून शिंदे-फडणवीस सरकारला अजूनही सिग्नल मिळालेलं दिसत नाही, असं म्हणत पवार यांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.