पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Eknath Shinde_Devendra Fadnvis
Eknath Shinde_Devendra Fadnvis
Updated on

मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Maharashtra Cabinet big decision for flood victims 13600 per hectare aid announced)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत वाढली, १०,००० कोटींना मान्यता

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईची मेट्रो ३ ची वाढलेल्या किंमतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. २०१५ साली याची किंमत २३,००० कोटी रुपये याची किंमत होती. पण मध्यंतरी कारशेडवरच्या स्थगितीमुळं अडीच वर्षे याचं काम बंद असल्यासारखं होत. त्यामुळं याची किंमती वाढली असून त्याला १०,००० कोटी रुपयांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळं हा प्रकल्प ३३,००० कोटी रुपयांचा झाला आहे. यातील स्थापत्य कामं ८५ टक्के पूर्ण झाली आहेत. इतर सर्व कामं मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहेत. कारडेपोचं काम २९ टक्केच पूर्ण झालेल आहे. ते काम आता वेगानं करुन त्याचा पहिला फेज २०२३ साली सुरु झाला पाहिजे असं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

प्रतिदिन १३ लाख लोक मेट्रोतून प्रवास करतील

त्यामुळं मेट्रो-३ च्या कामाला वेग येणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रतिदिन १३ लाख प्रवाशी प्रवास करतील. यामुळं ६ लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यांवरुन कमी होतील. २०३१ पर्यंत यातून १७ लाख लोक प्रतिदिन मेट्रोतून प्रवास करतील. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा या प्रकल्पामधून मिळणार आहे. त्यामुळं या प्रकल्पाला सर्व मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()