Maharashtra Politics: अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळणार, घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी

राज्यात चर्चेत असलेला राज्यमंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर होणार असल्याच्या चर्चा सुरू
ajit pawar
ajit pawar Esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला राज्यमंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान यावेळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) आमदारांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

तर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची प्रतीक्षा करत आहेत. तर महायुतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या प्रतीक्षेवर पाणी फिरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

ajit pawar
Raj Thackrey: फडणवीसांचा तो व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंचा संतप्त सवाल म्हणाले, हे खरंय का? मग...

दरम्यान अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळाल्यानंतर शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे गटातील अस्वस्थता गेले काही दिवस वाढत चालली होती.

ajit pawar
Mla Disqualification Case Maharashtra: तारीख ठरली! शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी

शिंदे गटात रस्सीखेच

शिंदे गटातील भरत गोगावले ,संदीपान भुमरे यांच्यासह सरकारला पाठिंबा देणारे बच्चू कडू या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. शिंदे गटात मंत्री होण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्यानेच विस्तार रखडला होता. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता शिंदे गटाकडून एखादे नाव अचानक समोर येवू शकते. अजित पवार गटातून साताऱ्यातील मकरंद पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

ajit pawar
Shivsena: शिवसेना कोणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस; उत्तर देण्यासाठी ८ दिवस बाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.