मंत्रिमंडळाचा पेच अखेर सुटला! उद्या होणार शपथविधी

maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp govt maharashtra politics
maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp govt maharashtra politics sakal
Updated on

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 38 दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. दरम्यान मंत्रीमंडळ विस्ताराला अखेव मुहूर्त मिळाला आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात असतील.

maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp govt maharashtra politics
मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल? विधिमंडळ सचिवांनी बोलावली तातडीची बैठक

लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp govt maharashtra politics
Royal Enfield Hunter 350 : किंमत कमी अन् फीचर्स दमदार, जाणून घ्या खासीयत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.