Cabinet Expansion : CM शिंदे अन् शहांमध्ये चर्चा; 60-40 चा फॉर्मुला निश्चित?

शिंदे-फडणवसी सरकारचा शपथविधी होऊन जवळपास आता एक महिना पूर्ण होत आहे.
Eknath Shinde Amit Shah
Eknath Shinde Amit ShahSakal
Updated on

Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे सरकार अल्पमतात आणून सत्तेत आलेल्या शिंदे फडणवसी सरकारचा शपथविधी होऊन जवळपास आता एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक स्तरावरून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या सर्वामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde Amit Shah
मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत; यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का

या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यामध्ये विस्ताराच्या पॉर्मूल्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे फडणवसी सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ललकरच होऊ शकतो या चर्चांना पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही नेत्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये 60-40 असा फॉर्मुला ठरल्याचे कळतंय. एवढेच नव्हे तर 31 जुलैनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde Amit Shah
Cabinet Expansion : CM शिंदे अन् शहांमध्ये चर्चा; 60-40 चा फॉर्मुला निश्चित?

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तब्बल पाच वेळा दिल्ली दौरा केला आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा तिढा काही केल्या अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यानंतर आता शिंदे आणि शहा यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे 31 जुलैनंतर तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.