Maharashtra Politics : अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार? भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही अंतर्गत खांदेपालट

Shinde-Fadnavis-Ajit Pawar Government
Shinde-Fadnavis-Ajit Pawar Governmentesakal
Updated on

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार सोबत घेऊन बंड केलं. यानंतर त्यांनी भाजपशी हातमीळवणी केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीचे समर्थक आमदार सोबत घेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

दरम्यान शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असतााना अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली.

मात्र, यानंतर एकनाथ शिंदे गटात तसेच भाजपच्या गोटात देखील मंत्रिपदासाठी रांगेत असलेले काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा समोर आल्या. दरम्यान आता या सर्व नाराज आमदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लवकरच राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shinde-Fadnavis-Ajit Pawar Government
Mumbai News : सी-लिंकवरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गाडी पार्क करून थेट समुद्रात घेतली उडी

शिंदे-फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशन सुरू आहे. हे अधिवेशन संपताच मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होऊन जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

Shinde-Fadnavis-Ajit Pawar Government
Jaipur-Mumbai Exp Firing : बोगीमध्ये मृतदेह पडले होते, हातात पिस्तुल घेऊन फिरत होता कॉन्स्टेबल; वाचा थरारक घटनाक्रम

शिंदे गटातील आमदारांची नाराजी आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणूका लक्षात घेता मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्यावर विचार सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या काही मंत्रीमंडळात अंतर्गत खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्रीमंडळ विस्तार होताच पालकमंत्री पदे हि दिली जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणत्या नेत्यांनी मंत्रिपद मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.