महत्त्वाचं खातेवाटप जवळपास निश्चित; कोणाकडं जाणार कुठलं खातं?

Eknath Shinde and devendra Fadnavis
Eknath Shinde and devendra FadnavisEknath Shinde and devendra Fadnavis
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पडताच ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या दोघांनीच शपथ घेतली. तेव्हापासून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet) होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच खातेवाटपाची घोषणा करणार असल्याचे म्हटले होते. अशात महत्त्वाचे खातेवाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे नगरविकास, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हे खात जाणार असल्याची माहिती आहे. तसेच भाजपकडे गृह, अर्थ व महसूल खात जाणार असल्याचे समजते. यातही गृह खात हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Eknath Shinde and devendra Fadnavis
मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) महत्त्वाचे खाते आपल्याकडे राहण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते. यासाठी मोठी चर्चाही होत असते. भाजपकडे येणारे अर्थ व महसूल खात कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना दिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या वाट्याला २७ तर शिंदे गटाच्या (Eknath Shinde) वाट्याला १४ मंत्रिपद येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर ते मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुंबईला निघाले आहे. मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चा होण्यापूर्वी मला आणि फडणवीसांना थोडा वेळ लागेल, असे सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

Eknath Shinde and devendra Fadnavis
संजय राऊत बंडखोर आमदारांच्या टार्गेटवर; संजय राठोड म्हणाले...

आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, यावर अधिकृत शिक्कामोर्तब ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणाऱ्या सुनावणीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिंदेच्या कोट्यात कपात होणार?

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना वगळता एकूण ३९ आमदारांनी त्यांना साथ देत सरकारला पाठिंबा दिला आहे. यातील आठ आमदार मंत्री होते. अशा स्थितीत शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या किती आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळते याकडे लक्ष राहणार आहे. सरकार स्थापनेपूर्वी मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास १३ मंत्रीपदे एकनाथ शिंदे यांच्या खात्यात जाऊ शकतात, अशी चर्चा होती. यापैकी ८ जणांना कॅबिनेट मंत्री तर ५ जणांना राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कोट्यात काही प्रमाणात कपात होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.