Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

राज्यात नव्याने अस्तितात्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली.
Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात
Updated on

Maharashtra Cabinet Meeting : राज्यात नव्याने अस्तितात्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यामध्ये काही महत्तपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये नेमकं निर्णय कोणते त्याबद्दल थोडक्यात.

  • राज्यातील कोरोना रूग्णसंख्या जरी आटोक्यात आहे. मात्र, अवेक जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली, तरी गाफील न राहता लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

  • १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेतासेराष्ट्रपिता हा सेवापंधरवडा राबविणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  • अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण

  • नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यताही आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत.

  • कोविड काळात कंत्राटी सेवा बजावलेल्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्यामधील भरतीवेळी अशी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांची गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढण्याचा निर्णयही आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यासाठी योजना राबविण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.