Ajit Pawar Portfolio : अखेर शिक्कामोर्तब! अजित पवारांकडे अर्थ खातं, वळसेंकडेही मोठी जबाबदारी; लवकरच घोषणा

अजित पवार गटातील इतर मंत्र्यांना मिळणार 'ही' खाती..
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या हालचाली घडत आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला बरेच दिवस उलटून गेले तरी मंत्र्यांचे खातेवाटप मात्र अद्याप झालेले नाही.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असलेल्या शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान खातेवाटपावरून शिवसेने-भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत बैठका घेतल्या जात आहेत.

तसेच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप लवकरच होईल अशी माहिती नेत्यांकडून देण्यात येत आहे. यादरम्यान गुरूवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ajit pawar
Rohit Pawar Latest News : 'मला कोणी नितेश राणे म्हणेल का काय, याची भीती वाटते'; रोहित पवार असं का म्हणाले?

अजित पवारांना अर्थ खातं

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात अर्थखाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे. ही दोन्ही खाती यापूर्वी भाजपकडे होती. त्यामुळे दीर्घ चर्चेनंतर भाजपकडील ही खाती राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

ajit pawar
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग! नाना पटोले दिल्लीत; मोठ्या निर्णयाची शक्यता

खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता. यानंतर बऱ्याच बैठका आणि चर्चा करण्यात आल्या मात्र अजित पवारांनी अर्थ खात्याचा आग्रह धरला होता. यानंतर अखेर खातेवाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार गटाला मिळणारी खाती

अर्थ खाते - अजित पवार

कृषी खाते- छगन भुजबळ

सहकार खाते- दिलीप वळसे पाटील

परिवहन- धर्मराव अत्राम

सामाजिक न्याय - धनंजय मुंडे

अन्न नागरी पुरवठा - अनिल भाईदास पाटील

महिला बाल कल्याण - अदिती तटकरे

क्रीडा - संजय बनसोडे

अल्पसंख्यांक - हसन मुश्रीफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.