मुंबई : प्रो-गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित प्रो-गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.