Maharashtra Congress: बालेकिल्ल्यात पुन्हा वर्चस्व! गेल्या तीन निवडणुकांमध्ये अशी बदलत गेली काँग्रेसच्या मतांची टक्केवारी

Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस या निवडणुकीत अनपेक्षित कामगिरी करत राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे 2014 नंतर काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Maharashtra Congress Lok Sabha Election Result 2024
Maharashtra Congress Lok Sabha Election Result 2024Esakal
Updated on

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल काल लागला त्यामध्ये देशात एनडीए आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर भाजपचा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात धुव्वा उडाला आहे.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस या निवडणुकीत अनपेक्षित कामगिरी करत राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे 2014 नंतर काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

गेल्या दोन निवडणुकींमधील निराशाजनक कामगिरी पक्ष, कार्यकर्ते आणि नेत्यांसाठीही उत्साह कमी करणारी होती. मात्र, यंदाच्या कामगिरीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने योग्य उमेदवार, सांधिक कामगिरी आणि महाविकास आघाडीची साथ याच्याने जीवावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

2014 मध्ये कशी होती काँग्रेसची कामगिरी?

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात लाट आली होती. यामध्ये देशासह महाराष्ट्रातील काँग्रेसचाही सुपडा साफ झाला होता. त्यावेळी काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या तर 2019 मध्येत तर 1 जागा काँग्रेसच्या पदरी पडली होती.

2014 मध्ये काँग्रेसने राज्यात 26 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी अशोक चव्हाण नांदेड आणि हिंगोलीतून राजीव सातव हे दोनच उमेदवार निवडणून आले होते. यावेळी काँग्रेसला 18.3 टक्के मते मिळाली होती. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या.

दुरीकडे सेना-भाजपच्या युतीने 43 तर एका अपक्षाने निवडणूक जिंकली होती.

Maharashtra Congress Lok Sabha Election Result 2024
BJP vs Shiv Sena: महायुतीत फाटणार? सर्व्हेच्या नावावर आमच्या जागा कापल्या, शिवसेना आमदाराचा रोख कुणाकडे

काँग्रेसची कामगिरी 2019 मधील कामगिरी

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे 26 आणि 22 जागा लढवल्या होत्या. काँग्रेसने 26 जागांपैकी बहुजन विकास आघाडी (BVA) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना (SSS) यांना प्रत्येकी 1 जागा दिली होती.

या निवडणुकीत मोदींची लाटा 2014 पेक्षा होती. यामध्ये काँग्रेसने लढवलेल्या 22 जागांपैकी बाळू धानोरकर यांनी जिंकली होती. यावेळी काँग्रेसची मतांची टक्केवारी 16.41 इतकी होती.

Maharashtra Congress Lok Sabha Election Result 2024
Devendra Fadnavis: " 'त्या' गोष्टीमुळे भाजपला महाराष्ट्रात फटका," फडणवीसांची कबुली पण रोख कुणाकडे?

2024 मध्ये काँग्रेसची जादू

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करत सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. यासह काँग्रेस राज्यातील अव्वल पक्ष ठरला.

या निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या. योग्य उमेदवार सर्व प्रमुख नेत्यांनी केलेले योग्य नियोजन आणि महाविकास आघाडीतील पक्षांची साथ मिळाल्याने काँग्रेसने हे यश खेचले. यावेळी काँग्रेसने 16.2 टक्के मते मिळवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.