तुम्ही करुन दाखवलं; महाराष्ट्राची देशात उंचावली मान : उद्धव ठाकरे

राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
Uddhav Thackarey
Uddhav Thackareyesakal
Updated on

सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात (coronavirus vaccination drive) आज (मंगळवार) महाराष्ट्राने (maharashtra) दाेन कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारत देशातील (India) एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackreay) , उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. (maharashtra continues forefront country carry vaccination drive cm uddhav thackeray congratulated healthcare trending news)

साेमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत दाेन कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

डाॅ. व्यास म्हणाले राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

लसीकरणाचा हा विक्रमी टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले असून या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मंत्री मंडळाने तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. त्यांनीही समाज माध्यमातून लसीकरणाचा काेट्यावधींचा टप्पा पार केल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.