मुंबई (Maharashtra corona update)- आज दिवसभरात 54 हजार 022 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना (corona) बाधित रुग्णांची एकूण संख्या 49,96,758 झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबई 3040,पुणे 4415,अहमदनगर 3357 येथे सापडले आहेत. राज्यात मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज 898 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नाशिक मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, मुंबई मनपा 71, नागपूर मनपा 55 ,सोलापूर 25 येथे मृत्यू नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे. (Maharashtra corona covid update recoveries Active cases health ministry)
आज नोंद झालेल्या 898 मृत्यूंपैकी 385 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 199 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत, तर 314 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,54,788 ॲक्टिव्ह रुग्ण ( Active cases) आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,89,30,580 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 49,96,758 (17.27 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,41,431 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसभरात 37,386 रुग्ण कोरोनामुक्त
आज 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 42,65,326 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.36 % एवढे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.