राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra corona update) मंगळवारच्या तुलनेत वाढ झालीये.
मुंबई- राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra corona update) मंगळवारच्या तुलनेत वाढ झालीये. गेल्या 24 तासांत राज्यात 34 हजार 031 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 51 हजार 457 नव्या रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. गेल्या 24 तासांत राज्यात 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 54 लाख 67 हजार 537 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 49 लाख 78 हजार 937 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 91.06 टक्के झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 4 लाख 01 हजार 695 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 84 हजार 371 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra corona update active cases patients rajesh tope health ministry)
दरम्यान राज्यात आज 594 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 594 मृत्यूंपैकी 335 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 259 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,18,74,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,67,537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 30,59,095 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 23,828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.