मुंबई : राज्यातील (Maharashtra) एकूण सक्रिय रुग्णांमध्ये (corona Active patient) एक तृतीयांश घट झाल्याची दिलायादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे. राज्यात 1 ऑगस्ट या दिवशी 78 हजार 962 सक्रिय रुग्ण होते. तर, एका महिन्यात सक्रिय रुग्णांचा (corona patient decreases) आलेख कमी होऊन 4 सप्टेंबर ला 52,025 वर पोहोचला. त्यामुळे, सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश ही घट नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, एकूण सक्रिय रुग्णांमध्ये जरी घट झाली असली तरी गेल्या 10 दिवसांमध्ये पुन्हा सक्रिय रुग्ण वाढले आहेत. 26 ऑगस्ट पासून पुन्हा सक्रिय रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. जुन महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. त्यानंतर, दर दिवशी 10 हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या येत होती. मात्र, आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाच हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत.
10 दिवसांची सक्रिय रुग्णांची आकडेवारी
26 ऑगस्ट - 50,393
27 ऑगस्ट - 51,754
28 ऑगस्ट - 51,821
29 ऑगस्ट - 52,844
30 ऑगस्ट - 51,834
31 ऑगस्ट - 51,238
1 सप्टेंबर - 51,078
2 सप्टेंबर - 50,607
3 सप्टेंबर 50,466
4 सप्टेंबर - 52,025
राज्यात 17 सप्टेंबर 2020 पर्यंत 3 लाख 01 हजार 752 सक्रिय रुग्ण होते. मात्र, दुसऱ्या लाटेत दुपटीने सक्रिय रुग्ण वाढले. 22 एप्रिल 2021 पर्यंत ही रुग्णसंख्या 6 लाख 99 हजार 858 वर पोहोचली. पण, आता 4 सप्टेंबरपर्यंत 52,025 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.
पाच जिल्ह्यांत 72 टक्के सक्रिय रुग्ण
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणारे जिल्ह्यांमध्ये पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 72 टक्के रुग्ण हे या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत.
जिल्हा सक्रिय रुग्ण टक्केवारी
पुणे - 15, 469 30 टक्के
ठाणे - 7,181 13 टक्के
सातारा - 6,175 11 टक्के
अहमदनगर - 5,051 9 टक्के
मुंबई 4,031 7.75 टक्के
6 जिल्ह्यांत कोविडचा प्रकोप कमी
6 जिल्ह्यांत कोविडचा प्रकोप एकदमच कमी झाला आहे. धुळे, नंदूरबार, वर्धा, वाशिम, भंडारा, आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये 10 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी आता कोविड नियंत्रणात आल्याचे दिसते.
धुळे - 0
नंदूरबार - 1
वर्धा - 3
वाशिम - 4
भंडारा - 4
गोंदिया - 5
16 टक्के गंभीर रुग्ण
3 सप्टेंबर या दिवशी आढळलेल्या एकूण 50 हजार 466 सक्रिय रुग्णांपैकी 16.70 टक्के म्हणजेच 8 हजार 426 एवढे रुग्ण हे गंभीर अवस्थेत असून या सर्वांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर, 6.69 टक्के म्हणजेच 3,376 रुग्णांना आयसीसूची गरज आहे. 2.72 टक्के म्हणजेच 1,375 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 2,001 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर, आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण 5,050 आहेत. तर, 24,179 (47.9 टक्के) एवढे रुग्ण रुग्णालयातील भरती असलेले रुग्ण आहेत. 26 हजार 287 रुग्ण लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेले 52.1 टक्के रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.