मुंबई : राज्यात कोविड महामारीला (corona pandemic) 21 महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान महाराष्ट्रात 66 लाख लोक या विषाणूच्या विळख्यात (corona virus) आले आहेत. या आजारात 21 ते 50 वयोगटातील तरुण आणि प्रौढांना या आजाराचा सर्वाधिक फटका (Teenager corona infected) बसला आहे. एकूण कोरोना रुग्णांपैकी (corona patients) 58 टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत.
राज्यातील लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आणि निर्बंध उठवल्यानंतर, तरुण आणि प्रौढ आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी कामावर गेले. या आजारानंतर धोका असूनही लोक जीवन जगण्यासाठी त्यांच्या कामावर परतले. या जीवन संघर्षात लाखो लोकांना व्हायरसची लागण झाली. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 66 लाख 70 हजार 441 नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
21 ते 30 वयोगटातील 11 लाख 93 हजार 466 जणांना विषाणूची लागण झाली आहे, तर 31 ते 40 वयोगटातील 14 लाख 81 हजार 374 आणि 41 ते 50 वयोगटातील 11 लाख 90 हजार 10 प्रौढांना या विषाणूची लागण झाली आहे. 21 ते 50 वयोगटातील लोकांना काम, अभ्यास आदींसाठी घराबाहेर पडावे लागत असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. त्यामुळे, या वयोगटातील लोकांना या विषाणूचा जास्त फटका बसला आहे.
11% मुले प्रभावित
तरुण आणि वृद्धांच्या तुलनेत कोरोनाचा मुलांवर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तरीही एकूण संक्रमित रुग्णांपैकी 11 टक्के रुग्ण हे 0 ते 20 वयोगटातील आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 0 ते 10 वयोगटातील 2 लाख 12 हजार 617 किशोरवयीन आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 4 लाख 97 हजार 486 मुलांना या आजाराची लागण झाली आहे.
मुंबईतही 50 टक्के तरुणांना त्रास
मुंबईत 7 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 20 ते 39 वयोगटातील 4 लाख 2 हजार 23 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, 0 ते 19 वयोगटातील 51,663 लहान आणि किशोरवयीन मुले या विषाणूच्या विळख्यात सापडली आहेत.
लस खूप महत्वाची
कोरोनापासून बचाव करण्यासाठी तरुणांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. इतर वयोगटातील लोकांनी ही लस घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, परंतु, कामगार वर्ग अधिक लोकांच्या संपर्कात येतो, त्यामुळे त्यांच्याकडून घरातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे फार महत्वाचे आहे.
डॉ. ओम श्रीवास्तव, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ
संक्रमित व्यक्तींची आकडेवारी (वयानुसार)
वयोगट संक्रमित
0 ते 10 212617
11 ते 20 497486
21 ते 30 1193466
31 ते 40 1481374
41 ते 50 1190010
51 ते 60 959297
61 ते 70 684484
71 ते 80 338288
81 ते 90 96964
91 ते 100 13923
101 ते 110 2532
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.