Crop Insurance: कृषी विभागाचे 'कागदोपत्री घोडे' ! शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीक विम्याची अग्रीम रक्कम अजूनही कागदावरच

दिवाळी दोन दिवसांवर आली असताना अद्याप पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळाली नसून शासनाच्या मदतीचाही पत्ता नाही.
Crop Insurance: कृषी विभागाचे 'कागदोपत्री घोडे' ! शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीक विम्याची अग्रीम रक्कम अजूनही कागदावरच
Updated on

Agriculture Department: अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन स्तरावर भरीव मदत देण्याचे आश्वासन देत दिवाळीपूर्वी रक्कम देण्याची घोषणाही केली होती. मात्र c सरकारची घोषणा हवेत विरणार असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसते.

यंदा सुरुवातीला पाऊस उशिरा झाला. त्यानंतर काही दिवस अतिवृष्टी झाली. दरम्यानच्या काळात पावसाचा खंडही पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे निम्‍म्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापण्याऐवजी संपूर्ण शेतातच रोटावेटर फिरवले.

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे नुकसान लक्षात घेता पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नागपुरात आले असता केली होती.(Latest Marathi News)

Crop Insurance: कृषी विभागाचे 'कागदोपत्री घोडे' ! शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीक विम्याची अग्रीम रक्कम अजूनही कागदावरच
पशुउत्पादकत्ता आणि गुणवत्ता वाढणार; शेतकरी-पशुपालकांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

६३ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

यंदा प्रथमच १ रुपयात विमा काढम्यात आला. नागपूर जिल्ह्यातील ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. लाभासंदर्भात विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही. (Latest Marathi News)

Crop Insurance: कृषी विभागाचे 'कागदोपत्री घोडे' ! शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीक विम्याची अग्रीम रक्कम अजूनही कागदावरच
Explainer : राज्यात विविध भागात मुसळधार पावसाचं कारण काय? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.