Ajit Pawar Video: "पहिल्या धारेची ते अख्खा खंबा...", अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही! असंही अजित पवार या कर्यक्रमावेळी बोलताना म्हणालेत
Ajit Pawar Video
Ajit Pawar VideoEsakal
Updated on

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने 63 व्या द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. समोरापावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांनी तूफान फटकेबाजी केली.

'मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही!, असं अजित पवार सभागृहात बोलताना म्हणाले आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान या 63 व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता अजित पवार याच्या भाषणाने झाली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळं काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकतंय. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्षपासून निर्माण केली जाणारी वाईन यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात. काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात. कुणाला पहिल्या धारेची किक बसते तर कुणाला अख्खा खंबा लागतो. पण मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही,' असं अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

Ajit Pawar Video
Weather Update: सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पाऊस बरसणार? पुणे वेधशाळेचा अंदाज काय?

तर पुढे अजित पवार म्हणाले की, 'मी अर्थमंत्री अन् उपमुख्यमंत्री असल्याने तुम्ही मला आज मोठेपण दिलं. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावलं, का बोलावलं? कारण अजित पवारकडे अर्थ खातं आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपलं काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिलं. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केलं असतं,' असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Ajit Pawar Video
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच जणांची भाजपमध्ये घरवापसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.