Maharashtra Din 2023 : शिवरायांच्या कारकीर्दीने संपूर्ण जग परिचित आहे. त्यांनी जिंकलेल्या किंल्ल्यांच्या रूपात आजही त्यांच्या जीवंत आठवणी आपल्या मनी आहेत यात वादच नाही. महाराजांचे किल्ले संपूर्ण भारतभरात ठिकठिकाणी आहे. मात्र महाराष्ट्रात शिवरायांनी भवानी मातेचे मंदिर उभालेला एक किल्ला आहे. जेथे आजही शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचे वास्तव्य आहे. यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या या किल्ल्याला नक्की भेट द्यायला हवी.
किल्ल्याची खासियत
किल्ला पारगड. पोर्तुगीजांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पारगड हा स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला ठरला. मावळ्यांच्या वंशजांचे आजही गडावर वास्तव्य आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले भवानी मंदिर किल्ल्यावर आहे. शिवकालीन गणेश मूर्ती, मारुतीचे मंदिर, महादेव मंदिर देखील इथे आहे.
सर्वांत उंच जागी महाराजांची सदर असून तिथे महाराजांचा ब्राँझचा पुतळा बसविण्यात आला आहे. पश्चिमोत्तर मजबूत तटबंदी असून भालेकर बुरुज, फडणीस बुरुज, महादेव बुरुज असे बुरुज आहेत. दक्षिणेला सर्जा दरवाजा व माळवे बुरुज उभा ठाकला आहे. पश्चिमेला भांडे व झेंडे बुरुज, पश्चिमेकडील तटबंदीला चोर दरवाजा पहायला मिळताे. गडाची उंची आणि तेथून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात वेगळा आनंद पर्यटकांना मिळताे. (Amazing Tourist Places)
या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
दरवर्षी माघ महिन्यात पौर्णिमेला भवानी देवीचा वार्षिक यात्रोत्सव येथे होतो. या निमित्ताने स्थानिक गावकरी रात्रीच्या वेळी ऐतिहासिक नाटक सादर करतात. पावसाळ्यात चार महिने या भागात प्रचंड पाऊस कोसळतो. पर्जन्यवृष्टीमुळे डोंगरदऱ्या हिरवाईच्या शालूने सजलेल्या असतात. त्यामुळे इथला निसर्ग अधिक भावतो. (Maharashtra)
सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तीनच वेळा चंदगड आगाराची एसटी या मार्गावर धावते. सुमारे बावीस किलोमीटरच्या या मार्गावर अन्य सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नाही. त्यामुळे स्वतःचे वाहन असल्यास उत्तम.
गडाच्या परिसरात विविध जातींचे वृक्ष, पशुपक्ष्यांचा वावर आढळून आहे. रात्रीच्या वेळी गडावरून गोव्याचे विहंगम दर्शन होते. सुमारे पावणेतीनशे पायऱ्या चढून गडावर जावे लागते. - घोडावाटेचे डांबरीकरण केल्यामुळे गाड्या थेट गडावर नेता येतात. (Fort) मात्र गडावर राहण्याची व भोजनाची व्यवस्था नाही. मात्र पारगड गावात पर्यटकांसाठी भोजनाची व्यवस्था होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.