Maharashtra Din : निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा! हिरवा शालू नेसून सजलाय हा घाट, नक्की बघा

आज आपण सह्याद्रीच्या कुशीतील अशाच एक घाटाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत
Maharashtra Din
Maharashtra Dinesakal
Updated on

Maharashtra Din 2023 : निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा!

उन्हाळ्यात काही घाट सदाबहार दिसतात आणि त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे ते पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठकतात. यंदा १ मे महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांना तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतील अशाच एक घाटाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर.

माळशेज घाट. वर्षा ऋतूत तर कातळघाट हिरवा शालू नेसलेल्या नववधूसारखा अगदी खुलून दिसतो. माळशेज घाटामधून कल्याणगून ओतूरकडे जाताना डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. हा धबधबा तिन धारांमधून कोसळत असल्याने अतिशय मनमोहक दिसतो. याला थिबतिचा धबधबा असंही म्हणतात.

थिबती हे माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले मुरबाड तालुक्यातील गाव. या गावात आदिवासी समाजाची मोठी वस्ती असून हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. उत्तुंग वाहत असलेल्या या धबधब्याचे सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही असे आहे.

Maharashtra Din
Maharashtra Din

या धबधब्याचं सौंदर्य बघण्यासाठी मात्र पायपीट करावी लागते. डोहात अनेक दगड गोटे असल्याने जरा जपूनच जलविहार करावा. पावसाळ्यात हा धबधबा उत्तुंग वाहतो आणि त्याने या परिसराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. बघता क्षणी त्या वेळी पर्यटक या नजाऱ्याच्या प्रेमात पडतात. (Maharashtra)

Maharashtra Din
Maharashtra Din 2023 : 'महाराष्ट्राची चेरापुंजी', राजा भोज यांची महाराष्ट्राला मिळालेली उत्तम भेट

थिबतीचा धबधबा बघण्यासाठी कुठून जावे?

कल्याण अहमदनगर महामार्गावर माळशेट घाटाच्या पायथ्याशी सावर्णे नावाचे गाव आहे. तेथून तिबती गावात जाता येते. सावर्णे गावातून गाडी पार्क करून पायी चालत थिबती गावात जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.