Pune Sujata Mastani
Pune Sujata Mastanisakal

Maharashtra Din : पुणेकरांना सुजाता मस्तानीचं एवढं वेड का? लोक तुटून पडण्यामागील 'हे' आहेत कारणे

पुण्यात आल्यानंतर तुम्ही मस्तानी एकदा तरी टेस्ट करावी आणि तेही सुजाता मस्तानी.
Published on

Maharashtra Din : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक जिल्हा, शहर आणि गावात आपल्याला वेगवेगळे आणि हटके खाद्यपदार्थ अनुभवाला मिळतात. महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. येथील चितळेची बाकरवडी असो की मिसळपाव लोक खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात पडतात. असाच एक आगळा वेगळा पदार्थ आहे जो पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाने खावा, तो म्हणजे मस्तानी.

तुम्ही जर पुण्याच्या बाहेरचे असाल तर कदाचित तुम्हाला मस्तानी माहिती नसेल पण पुण्यात आल्यानंतर तुम्ही मस्तानी एकदा तरी टेस्ट करावी आणि तेही सुजाता मस्तानी. मस्तानी म्हणजे काय? सुजाताा मस्तानी कशी फेमस झाली? पुणेकरांना सुजाता मस्तानीचं एवढं वेड का? मस्तानीवर लोक का तुटून पडतात? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Maharashtra Din why is Pune Sujata Mastani so famous read history)

मस्तानी म्हणजे काय?

मस्तानी म्हटलं की आपल्या तोंडी येतं बाजीरावची मस्तानी येतं पण ही मस्तानी बाजीरावची मस्तनी नव्हे तर एक टेस्टी पेय आहे. बर्फ, दूध आणि आइस्क्रीम याचे मिश्रण करुन जो पदार्थ बनवला जात होता त्याला मस्तानी म्हणायचे.

पुढे सुजाता मस्तानीने यात अविष्कार करून हा पदार्थ आणखी टेस्टी केला. बर्फाऐवजी आइस्क्रीम,आटवलेले दुध आणि त्यावर आइस्क्रीमचा गोळा आणि त्यावरही केशर आणि ड्रायफुट्सजी सजावट करतात.

Pune Sujata Mastani
Pune Sujata Mastanisakal
Pune Sujata Mastani
Maharashtra Din : गिला वडा अमरावतीत कसा आला? वाचा फेमस लोकल फूडची अनोखी कहानी

सुजाताा मस्तानी कशी फेमस झाली?

पुण्यातील सदाशिव पेठेत शरदरावजी मामा कोंढाळकर हे पानाचे दुकान चालवायचे. एकदा त्यांच्या पानाच्या दुकाना शेजारचे किराणाचे दुकान बंद पडू लागले तेव्हा त्यांनी ते दुकान भाड्याने घेऊन त्याजागी आईसस्क्रीम विकायचे ठरविले आणि १९६८ च्या दरम्यान आइस्क्रीमचे दुकान सुरू केले. आपल्या मुलीच्या नावावर त्यांनी सुजाता हे नाव दुकानाला दिले. पुढे विक्री वाढल्याने त्यांनी मस्तानीही विकण्याचे ठरविले.

बर्फ, दूध आणि आइस्क्रीम याचे मिश्रण म्हणून ओळखली जाणारी मस्तानीमध्ये कोंढाळकरांनी बरेच बदल केले आणि हळूहळू मस्तानीला सुजाता मस्तानी म्हणून नवीन ओळख मिळाली. पुणेकरांना सुजाता मस्तानीचे वेड लागले. पिस्ता मँगो, रोझ मँगो, मँगो चॉकलेट यासारखे विविध फ्लेवर्समुळे सुजाचा मस्तानी आणखी फेमस झाली.

पुढे ८० च्या दशकात सुजाता मस्तानीला आपल्या हक्काची जागा मिळाली आणि ही मस्तानी चाखण्यासाठी रात्रीच्या वेळी एवढी गर्दी असायची की ट्रॅफिक जॅम होत असे. सदाशिव पेठेत त्यांची मुळ दोन दुकाने आणि शहरभर अन्य दुकानांमुळे सुजाता मस्तानीचा विस्तार वाढला. कोंढाळकरांची नवी पिढीही यात जोमाने काम करतेय.

Pune Sujata Mastani
Maharashtra Din : जयसिंगपूरचं भडंग चक्क अमेरिकेतही फेमस; तुम्ही कधी खाल्लंय का?

पुण्याच्या फेमस मस्तानी घरी कशी बनवायची?

साहित्य

  • आंबे

  • आईस्क्रीम

  • दुध

  • साखर

  • आईसक्युब्स

कृती

  • सुरवातीला आंबे धुवून घ्यावे

  • .त्यानंतर आंब्याचे साल काढून घेऊन छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आंबे कापावे.

  • काही तुकडे बाजूला ठेवावे तर काही आंब्याचे तुकडे, त्यात साखर, आईस्क्रीम, दुध आणि आईसक्युब्स एकत्र करून मिक्सरमधून काढावे.

  • हे मिश्रण दोन ग्लास मध्ये टाकावे त्यापूर्वी बाजूला ठेवलेले आंब्याचे तुकडे ग्लासमध्ये टाकावे.

  • मिश्रण टाकल्यानंतर त्यावर आईस्क्रीम आणि आईसक्युब्स टाकावा.

  • सर्वात शेवटी यावर काजू बादाम पिस्ताचे छोटे छोटे तुकडे टाकावे. यामुळे मस्तानी आणखी टेस्ट येते.

  • तुमची मँगो मस्तानी तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.