Maharashtra Doctors strike update : राज्यातील ७ हजारहून अधिक निवासी डॉक्टर त्यांच्या विविध मागण्यांसाठी (२ जानेवारी २०२३) बेमुदत संपावर गेले होते. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना म्हणजेच मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने संप पुकारला होता. दरम्यान मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला असून डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) च्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात यश आलं असून मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सीनियर रेसिडेंट्सचा १४३२ पदांचा प्रश्न होता, दोन ते तीन दिवसांमध्ये ही सगळी पदे भरली जातील असे महाजन म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न देखील सोडवले जातील असं अश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
केंद्र शासनाकडे ५०० कोटींची मागणी करत आहे, सीएसआर कंपन्यांकडे देखील हॉस्टेल बांधण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना निवासाची सोय करून दिली जाईल असेही महाजन म्हणाले. तसेच महापालिकांच्या प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे असेही महाजन म्हणाले. संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी संप मागे घतल्याचे देखील ते म्हणाले.
डॉक्टरांच्या काय मागण्या होत्या
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ जागांची पद भरती करावी तसेच शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये नवी वसतीगृहं बांधावीत, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावं अशा मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.