Devendra Fadnavis: "शेतकऱ्यांना सीबील मागाल तर एफआयआर करू," फडणवीसांची बँकांना तंबी

Crop Loan: पीक कर्जासाठी सीबीलची कारणे देत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास बँकांवर एफआयआर केला जाणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

आज मुंबईतील झालेल्या खरीप पूर्व हंगाम बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीक कर्जासाठी सीबीलची कारणे देत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास बँकांवर एफआयआर केला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली.

Devendra Fadnavis
Nilesh Lanke: 'आय निलेश लंके, टेक ओथ...'; सुजय विखेंचं आव्हान स्वीकारलं अन् इंग्रजीमधून संसदेत घेतली शपथ

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज आमची आरबीआयच्या प्रतिनीधी आणि स्टेट बँकर्स कमिटीशी बैठक झाली. यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की, शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सीबीलची अट लागू करू नये. ते दर सीबीलची अट लागू करणार नाहीत असे म्हणतात पण प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना सीबीलचे कारण देत कर्ज नाकारतात. पण यावेळीही असेच झाले तर आम्ही बँकांवर एफआयआर दाखल करणार आहोत."

Devendra Fadnavis
Amit Shah: साखर उद्योगासंदर्भात हर्षवर्धन पाटीलांनी अमित शहांशी केली महत्वाची चर्चा, वाचा भेटीची इनसाईड स्टोरी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, "आज आम्ही शेतकऱ्यांच्या पेरणी संदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. कर्जाच्या बाबतीत सूचना केल्यानंतर पेरणीसाठी बीयाणांच्या संदर्भातही निर्णय घेण्यात आले आहेत."

खतांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, "यावेळी प्रयत्न आहे की, डीएपीचा वापर कमी करत नॅनो युरियाचा वापर वाढवावा लागेल. कारण सध्या जगभरात डिएपीची कमतरता जाणवत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.