Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा

Ashish Deshmukh: महाराष्ट्रात तसेच देशात अनेक पराभूत उमेदवार लाखा लाखांच्या मतांनी पराभूत झालेत
: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा
Mahavikas Aghadisakal
Updated on

Amravati : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर जातीय कार्ड खेळण्यात आले.

त्यामुळे महायुतीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. आघाडीने राज्यात वातावरण कलूषित केले, असा आरोप भाजप ओबीसी मोर्चाचे प्रभारी, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज (ता.२०) येथे केला.

: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा
Amravati News : माता व बालमृत्यू प्रकरणाची दखल;आरोग्य उपसंचालक धारणीत

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी ते अमरावतीत आले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. श्री. देशमुख म्हणाले, नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून रुसवे फुगवे असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीत कुठेच ते दिसले नाहीत.

त्यामुळेच नवनीत राणा यांना पाच लाखांवर मते मिळाली. महाराष्ट्रात तसेच देशात अनेक पराभूत उमेदवार लाखा लाखांच्या मतांनी पराभूत झालेत. मात्र नवनीत राणा केवळ १९ हजार मतांनी पराभूत झाल्या.

: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा
Amravati City: घोस्ट सिटी होणार राज्याची राजधानी, आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या भांडणात भकास होता विकास

याचाच अर्थ त्यांना पक्षांतर्गत कुठलाही विरोध नव्हता. त्या जनतेच्या उमेदवार होत्या, मात्र महाविकास आघाडीच्या विखारी प्रचारामुळे त्यांना पराभव पत्करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची दुरुस्ती करून येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे आता पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे

. जनतेने पक्षाला भरभरून मते दिल्याने लवकरच प्रदेश भाजपकडून धन्यवाद यात्रा सुरू केली जाणार आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून पिकांच्या हमी भावामध्ये वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा
Amravati News : बालमृत्यूने हादरले बागलिंगा गाव! बहीण-भावाचा मृत्यू

याशिवाय अनेक महत्त्वाकांक्षी योजना येणाऱ्या काळात राबविण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, जयंत डेहणकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, राजेश वानखडे, माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, केवलराम काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पटोलेंनी केला शेतकऱ्यांचा अपमान

शेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःला देव समजून एका शेतकरी कार्यकर्त्याच्या हाताने आपले पाद्यपूजन करवून घेतले. हा प्रकार शेतकऱ्यांचा अपमान करणारा असून नाना पटोले यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे, अशी माागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केली.

: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा
Amravati Loksabha: पवारांच्या गद्दारीचा मतदारांनी बदला घेतला, राणांचा दिल्लीचा रस्ता रोखला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.