बंडखोरांचे पुतळे जाळणारे संतोष बांगर शिंदेंच्या बसमध्ये, सेनेचा आणखी एक आमदार फुटला

Maharashtra Floor Test Today
Maharashtra Floor Test Todayesakal
Updated on

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. दरम्यान, यापूर्वीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले आहेत.(Maharashtra Floor Test Today shivsena santosh bangar eknath shinde maharashtra politics)

Maharashtra Floor Test Today
ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? राऊतांचा शिंदे गटाला टोला

कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणारे आज शिंदे गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री संतोष बांगर यांना फोन आला होता. मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी झाल्याने बांगर शिंदे गटात सामील झाले. अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.( Floor Test in Maharashtra)

शिवसेना पक्षातील बंडाळीदरम्यान आमदार संतोष बांगर यांना १०० कोटी रुपयांची ऑफर आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. यानंतर बांगर यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आपण पैशाला बळी पडणार नाही. बाळासाहेबांनी व शिवसेनेने माझ्यावर फार मोठा विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्या विश्वासाला मी मरेपर्यंत तडा जाऊ देणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.

Maharashtra Floor Test Today
Maharashtra Floor Test: सेनेनंतर NCP मध्येही फूट? पाच आमदार राहिले होते गैरहजर

याबरोबर ईडी सारख्या चौकशीला मी घाबरणारा आमदार नसून त्याला प्रत्युत्तर म्हणून ईडी मागे लावणार असेल तर त्याला आपण काडी लाऊ, असे प्रत्युत्तर बांगर यांनी दिले होते.

मागील महिन्यात म्हणजेच २४ जूनला हिंगोलीमध्ये शिवसेनेच्यावतीने बंडखोरांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बंडखोरीविरोधात भूमिका घेतल्याने बांगर यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

यावेळी भाषण करताना संतोष बांगर ढसाढसा रडले होते. तुम्ही पुन्हा पक्षात या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील असे आवाहन त्यांनी केले होते. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी एवढी मोठी मिरवणूक काढली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक कायम उद्धव यांच्या पाठिशी असणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या भाषणाची जोरदार चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.